मुंबई: करोना व्हायरसची लागण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्व जण घरीच बसून ऑनलाइन एकमेकांशी संवाद साधत आहेत. अनेक क्रिकेटपटू लोकांना करोना पासून कशी काळजी घ्यावी याबद्दल सोशल मीडियावरून सांगत आहेत. अशातच आजी-माजी क्रिकेटपटूंनी मिळून एक धमाल व्हिडिओ गाण तयार केले आहे. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर लाँच केले. “डोन्ट यू वरी, बस ना घरी…” असे या गाण्याचे बोल असून चाहत्यांमध्ये हे गाण हिट ठरले आहे.

वाचा-
निर्माता, संगीतकार अभिजीत कवठाळकरने घरी राहण्याचा विचार हलकाफुलक्या पद्धतीने एका गाण्यातून मांडला आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, वसिम जाफर, साईराज बहुतुले, जेमिमा रॉड्रिक्स अशा प्रसिद्ध आजी-माजी क्रिकेटपटूंचा सहभाग आहे. संदर्भात जनजागृती करण्यासाठी अनेक व्हिडिओ आतापर्यंत आले आहेत. पण आजी माजी क्रिकेटपटूंचा समावेश असलेला हा पहिलाच व्हिडिओ आहे.

वाचा-
“डोन्ट यू वरी, बस ना घरी…” या गाण्याचे लेखन, संकल्पना, संगीत दिग्दर्शन अभिजीतनेच केली असून तर निर्मिती अभिजित आणि डॉ. ज्योत्सना चित्रोडा यांनी केली आहे. करोनामुळे घरी राहण्याचे महत्त्व अतिशय मनोरंजक पद्धतीने या व्हिडिओतून सांगितले आहे. या गाण्याचा व्हिडिओ श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, वसिम जाफर, साईराज बहुतुले, जेमिमा रॉड्रिक्स, चंद्रकांत पंडित, सिद्धेश लाड, पारस म्हांब्रे, बलविंदरसिंग संधू, मोमा मेश्राम, राहुल त्रिपाठी, शंतनू सुगवेकर, इक्लाब सिद्दिकी, धीरज जाधव या क्रिकेटपटूंनी आपापल्या घरीच राहून शूट केला आहे.

वाचा-

वाचा-
करोनामुळे आजुबाजूला अतिशय निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना हसत-खेळत संदेश देण्याची गरज वाटली. आज आपल्या हाती जे काही आहे, ते करून आयुष्य छान साजरे करायला हवे. त्यासाठी अतिरेकी काळजी न करता केवळ शांतपणे घरी बसणे आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये सहभाग घेतलेले सर्व क्रिकेटपटू आपापल्या घरी राहून आपल्या फिटनेसची काळजी घेतायत. खेळाबाबत विचार करतायत. कुटुंबासह क्षण साजरे करत आहेत. अशाच पद्धतीने सर्व नागरिकांनीही अनुकरण केले पाहिजे, असे अभिजीतने सांगितले.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here