आज किती वाजता कोणता सामना होणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
अॅथलेटिक्स : ऊंचउडीत तेजस्विन शंकर आणि लांबउडीमध्ये मोहम्मद अनस व मुरली श्रीशंकर हे पदकाचे दावेदार मानले जात आहेत. हा सामना दुपारी २.३० वाजता सुरू होणार आहे.
बॅडमिंटन : मिक्स्ड टीम इवेंटचे सामने दुपारी ३.३० वाजता सुरू होतील.
वेटलिफ्टिंग : पुरुष ९६ किलो गटात विकास ठाकूर आणि महिला ७६ किलो गटात पूनम यादव, महिला ८७ किलो गटात बीएन उषा या पदक मिळवण्याच्या दावेदार असून दुपारी २ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
लॉन बॉल: महिला संघाचा अंतिम सामना ४.१५ वाजता रंगणार आहे.
हॉकी : भारतीय महिला हॉकी संघाचा आज ६.३० वाजता इंग्लंडविरुद्ध सामना होणार आहे.
बॉक्सिंग : रोहित टोकस याचा रात्री ११.४५ ला तर आशिष कुमारचा सामना रात्री १ वाजता होईल.
चौथ्या दिवसअखेर भारताच्या खात्यात तीन सुवर्ण पदके
भारताचा वेटलिफ्टर अचिंता शेउलीने सोमवारी सुवर्णपदक मिळवलं आहे. चौथ्या दिवसअखेर भारताच्या खात्यात तीन सुवर्ण पदके जमा झाली आहेत. विशेष म्हणजे ही तिन्ही सुवर्णपदके भारताला वेटलिफ्टिंगमध्ये मिळाली आहेत. चौथ्या दिवसअखेर भारताच्या खात्यात तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक ब्राँझपदक जमा झाले आहे. अचिंताच्या आधी मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा यांनी भारताला सुवर्णयश मिळवून दिले. भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पार पडलेल्या पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत अचिंताने एकूण ३१३ किलो (१४३ किलो+१७० किलो) भार उचलून सुवर्णपदक निश्चित केले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times