सध्याच्या घडीला एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. करोना व्हायरसचा प्रसार हा चीनमधून झाला. पण करोना व्हायरसबाबत चीनने एक मोठी गोष्ट लपवली आहे. हा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.

करोना व्हायरस चीनमधून जगभरात पसरला. सध्याच्या घडीला जगभरात चिंतेचे वातावरण आहे. संपूर्ण जग या करोना व्हायरसमुळे ठप्पा झालेले आहे. त्याचबरोबर या करोना व्हायरसमुळे बऱ्याच लोकांचे बळीही गेलेले आहेत. त्यामुळे या वातावरणातून बाहेर कसे पडायचे, याचा विचार आता केला जात आहे. पण अजूनही करोनावर कोणतेही औषध सापडलेले नाही त्यामुळे सध्याच्या घडीला तरी यामधून पूर्णपणे बाहेर येऊ शकत नाही, असे म्हटले जात आहे.

वाचा-

नोव्हेंबर महिन्यात करोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आणि त्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले, असे चीनने यापूर्वी म्हटले आहे. पण चीन जगाशी खोटं बोलत आहे. कारण याबाबतची पुरावा आता समोर आला आहे. चीनमध्ये करोना व्हायरस हा नोव्हेंबर नाही तर ऑक्टोबर महिन्यामध्येच पसरलेला होता आणि ही धक्कादायक गोष्ट आता सर्वांपुढे आली आहे.

चीनमध्ये ऑक्टोबर महिन्यात मिलिटरी स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत १०० देशांतील जवळपास १० हजार खेळाडू सहभागी झाले होते. त्यावेळी या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनाही करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. याचा अर्थ हा करोना व्हायरस त्यापूर्वीपासून चीनमध्येच होता आणि त्यानंतर तो ऑक्टोबरमध्ये सर्वत्र पसरला.

वाचा-

याबाबत इटलीची खेळाडू मॅटेओ तॅलिओरियोलने याबाबत म्हटले आहे की, ” ऑक्टोबरमध्ये स्पर्धेसाठी मी चीनमध्ये गेली होती. तेव्हा मला जबरदस्त ताप आला होता, असा ताप मला आयुष्यात कधीही आलेला नव्हता. त्यावेळी मला करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. करोनामधून बाहेर येण्यासाठी मला तीन आठवे उपचार घ्यावे लागले. माझ्याबरोबरच मुलाल आणि नवऱ्यालासुद्दा करोना झाला होता. त्यांच्यावरही उपचार करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांत करोना जगभरात पसरल्याचे पाहायला मिळाले.”

वाचा-

ऑलिव्हर जॉर्ज या खेळाडूने सांगितले की, ” ऑक्टोबर महिन्यात आम्ही जेव्हा चीनमध्ये गेलो होतो, त्यावेळी त्यांच्याकडे लॉकडाऊन सुरु होते. चीनमधील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. भर दिवसा आम्हाला रस्ते सुने वाटत होते. आम्ही नक्कीच चीनमध्येच आहोत ना, यावर आम्हाला विश्वात बसत नव्हता.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here