सध्याच्या घडीला एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीला संघात घेण्यासाठी लाच मागण्यात आली होती, असा खुलासा दस्तुरखुद्द कोहलीनेच केला आहे.

कोहलीला कोणीही ग्रँडफादर नव्हता. पण कोहलीकडे गुणवत्ता होती. त्याचबरोबर स्थानिक क्रिकेटमध्ये त्याची कामगिरीही चांगली होत होती. पण तरीही विराटला संघात घेण्यासाठी लाच मागितल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

वाचा –

कोहली हा चांगली कामगिरी करत होता. पण संघाची निवड करण्यापूर्वी त्याच्या वडिलांना एका व्यक्तीने बोलावले. त्यांनी विराटच्या वडिलांना सांगितले की, तुमचा मुलगा चांगली कामगिरी करत आहे. पण त्याला जर संघात घ्यायचे असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील. तुम्ही पैसे दिले तर तुमच्या मुलाला आम्ही संघात स्थान देऊ.

विराटचे वडिल हे वकिल होते. त्याचबरोबर ते प्रामाणिकपणे आपले काम करत होते. त्यामुळे त्यांनी या व्यक्तीला सांगितले की, जर विराट चांगली कामगिरी करत असेल तर त्याला संघात स्थान मिळायला हवे. त्यासाठी अन्य कोणत्याही गोष्टीची गरज नाही. त्यामुळे विराटला संघात घेण्यासाठी मी पैसे देणार नाही. पण तुम्हाला वाटत असेल की, तो एक चांगला क्रिकेटपटू आहे तर तुम्ही त्याला संघात स्थान द्या.

वाचा-

यानंतर विराटची संघात निवड झाली नाही. त्यामुळे विराटला रडू आवरता आले नव्हते. पण या घटनेनंतर विराट त्वेषाने मैदानात उतरला. चांगली कामगिरी करायला लागला, त्यामुळे अखेर विराटला संघात स्थान द्यायलाच लागले.

याबाबत विराट म्हणाला की, ” माझे बाबा प्रामाणिक होते. त्याची राहणी साधी होती. त्यामुळे या अशा गोष्टीही असतात, हे त्यांना माहितीही नव्हते. जेव्हा पैसे देऊन संघात मला स्थान देण्याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी नाही म्हटले. कारण ज्याच्याकडे गुणवत्ता आहे त्याला संघात स्थान मिळायलाच हवे, अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी कोणतेही वाईट कृत्य केले नाही पाहिजे, हा त्यांचा विचार होता. त्यामुळे माझ्या वडिलांनी मला संघात घेण्यासाठी लाच दिली नाही. दिल्लीमध्ये काही वेळा स्थानिक पातळीवर अशा गोष्टी घडत असतात. पण या गोष्टी चुकीच्या आहेत आणि त्या बंद व्हायला हव्यात.”

(याबाबतचे वृत्त दैनिक जागरण या वेबसाईटने प्रकाशित केले होते.)

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here