बर्मिंगहॅम: इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला संघाने देशाला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. या क्रीडा प्रकारातील देशाचे हे पहिलेच पदक ठरले आहे. ज्या खेळाबद्दल देशातील मोजक्या लोकांना माहिती आहे, अशा खेळात सुवर्ण पदक जिंकल्याचा अभिमान सर्वांना होत आहे. अंतिम सामन्यात भारताने द.आफ्रिकेचा १७-१० असा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचे हे चौथे सुवर्णपदक आहे.


सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा १६-१३ असा पराभव केला होता. त्या सामन्यात भारत १-६ अशा पिछाडीवर होता तेव्हा त्यांनी जोरदार कमबॅक केले आणि विजय मिळवला होता.

वाचा- भारत-पाकिस्तान क्रिकेटचा सामना या महिन्यात कधी व कुठे होणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या अंतिम लढतीत भारताने सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. प्रथम दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत होते. त्यानंतर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला पुढे येऊ दिले नाही. भारताने आधी ही आघाडी ४-२ अशी केली.

वाचा- प्रवासी विमानात बसले होते आणि अचानक…; दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण अपघात टळला

सहाव्या फेरीनंतर भारताने ७-२ अशी भक्कम आघाडी घेतली होती. सातव्या फेरीनंतर ही आघाडी ८-२ अशी झाली. भारत विजयाच्या दिशेना जात असताना द.आफ्रिकेच्या संघाने जोरदार कमबॅक केले. २-८ने पिछाडीवर असलेल्या आफ्रिकेने आधी ८-८ अशी बरोबरी केली. त्यानंतर १०-८ अशी आघाडी घेतली. १०व्या फेरीनंतर दोन्ही संघांनी प्रत्येकी १० गुण मिळवत बरोबरी केली होती. १३व्या फेरीनंतर भारताने १२-१० अशी आघाडी घेतली. १४व्या फेरीत भारताने आघाडी आणखी वाढवत ती १५-१० अशी केली आणि अखेर १७-१० सह विजय देखील मिळवला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

8 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here