नवी दिल्ली: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात पहिले द्विशतक झळकावण्याचा विक्रम आहे. त्याने २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्वालियर येथील सामन्यात नाबाद २०० धावांची खेळी केली होती. अशी खेळी करणारा तो पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला होता. सचिनच्या या खेळी संदर्भात आफ्रिकेचा जलद गोलंदाज डेल स्टेनने एक धक्कादायक दावा केला होता.

वाचा-

प्रेक्षकांच्या भीतीने सचिनला आऊट दिले नाही!
या सामन्यात सचिन १९० धावांवर खेळत असताना बाद झाला होता. पण अंपायर इयान गूल्ड यांनी त्याला बाद दिले नाही, असे स्टेन म्हणाला होता. सचिन द्विशतकापासून १० धावा दूर होता आणि माझ्या चेंडूवर तो LBW झाला. पण अंपायरनी त्याला बाद दिले नाही. यासंदर्भात मी त्यांना मैदानातच विचारणा केली असता ते म्हणाले, मित्रा आजूबाजूला बघ त्याला (सचिन) बाद दिले. तर मी हॉटेलमध्ये जाऊ शकणार नाही.

वाचा-
स्काय स्पोर्ट्सच्या पॉडकास्टमध्ये इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अॅडरसन सोबत चॅटवर त्याने ही गोष्ट सांगितली होती. सचिनने आमच्या विरुद्ध पहिले द्विशतक झळकावले. पण मी त्याला १९० धावांवर बाद केले होते. पण इयान गूल्ड यांनी त्याला नॉट आऊट दिले नाही.

फॅक्ट चेक…
या द्विशतकी खेळीत जेव्हा सचिन १९० धावांवर खेळत होता. तेव्हा स्टेनचे फक्त ३ चेंडू सचिनला खेळता आले. त्यापैकी दोन चेंडूवर प्रत्येकी एक धाव घेतली तर तिसरा चेंडू स्टेनकडे परत आला होता. संपूर्ण सामन्यात ७ व्या षटकात स्टेनचा चेंडू सचिनच्या पॅडला लागला होता. तेव्हा २५ धावांवर खेळत होता. पण हॉकआयवरून स्पष्ट दिसत होते की चेंडू स्टंपला लागत नव्हता. सचिनने मॅचमध्ये स्टेनचे एकूण ३१ चेंडू खेळले त्यातील १६वर धाव काढली नाही. तर १५ चेंडूवर ७ चौकारांच्या मदतीसह ३७ धावा केल्या.

वाचा-
स्टेनच्या दाव्यानुसार १९०वर खेळत असताना अंपायर इयान गूल्ड यांनी सचिनला प्रेक्षकांच्या भीतीने बाद दिले नाही. पण स्टेनने सचिनला संपूर्ण सामन्यात टाकलेल्या ३१ चेंडूपैकी एकही LBWच्या अपीलचा नव्हता.

या सामन्यात सचिने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावण्याचा मान मिळवला होता. सचिनने १४७ चेंडूत २५ चौकार, ३ षटकारांसह नाबाद २०० धावा केल्या. तर भारताने ३ बाद ४०१ धावांचा डोंगर उभा केला. उत्तरा दाखल आफ्रिकेला २४८ धावा करता आल्या आणि भारताने तो सामना १५३ धावांनी जिंकला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here