नवी दिल्ली: how lawn bawls played बर्मिंहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला संघाने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. टीम इंडियाने आधी सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा १६-१३ असा पराभव केला आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा १७-१० असा पराभव करून देशाला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले.

लॉन बॉल क्रीडा प्रकारात २२ वर्षात देशाला मिळालेले हे पहिले पदक आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लॉन बॉल हा प्रकार फार लोकप्रिय आहे पण भारतात हा खेळ फार कमी लोकांना माहिती आहे. जाणून घेऊयात देशाला सुवर्ण पदक मिळवून देणारा हा खेळ खेळतात तरी कसा, त्याचे नियम काय आहेत आणि संघ कसा असतो.

वाचा- राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्ण; महिला संघाने लॉन बॉलमध्ये इतिहास घडवला

लॉन बॉल खेळाचा इतिहास (History of Lawn Bowls )

लॉन बॉल हा मैदानात आणि हॉल मध्ये म्हणजे इनडोअर आणि आउटडोर अशा प्रकारे खेळला जातो. १९३० साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत हा खेळ होता. भारतीय संघाला २२ वर्षात कधीच या खेळात पदक मिळाले नाही. या खेळात इंग्लंडचा दबदबा अधिक आहे. इंग्लंडने यामध्ये आतापर्यंत ५१ पदक जिंकली आहेत, ज्यात २० सुवर्ण, ९ रौप्य आणि २२ कांस्य पदक आहेत.

वाचा- भारताला लॉन बॉलमध्ये सुवर्णपदक जिंकवून देणारे मधुकांत पाठक आहेत तरी कोण, जाणून घ्या…

लॉन बॉलचे नियम (what is rules of Lawn Bowls )

या खेळातील नियम फार वेगळे आहेत. अनेक लोकांना या खेळाबद्दल देखील माहिती नाही. यात एक चेंडू वापरला जातो, जो रबर, लाकूड आणि प्लॉस्टिकचा असतो. या चेंडूचे वजन १.५९ किलोग्रॅमपर्यंत असते. हा खेळ एका मोकळ्या मैदानावर खेळला जातो आणि तेथे चेंडू फेकला जातो. चेंडूला रोल करत खेळाडू तो पुढे नेतात. या चेंडूला जॅकपर्यंत पोहोचवावे लागते. जो संघ जॅकपर्यंत पोहोचवतात त्यावरून गुण मिळतात. चेंडू जेथून टाकला जातो तेथून जॅकचे अंतर २३ मीटर इतके असते.

वाचा- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२- पाचव्या दिवसाचे लाइव्ह अपडेट

कसा खेळला जातो लॉन बॉल

लॉन बॉल एकूण चार प्रकारे खेळला जातो. महिला आणि पुरुष असे दोन संघ असतात. यात सिंगल, डबल, तीन खेळाडू आणि चार खेळाडूंचा संघ देखील असतो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here