वाचा–
यशस्वी आणि त्याचे प्रशिक्षक यांनी मुंबईतील छोट्या मोठ्या ४० क्रिकेट स्टेडियममधील स्टाफची मदत केली आहे. इतक नव्हे तर त्यांनी इतरांना मदत करण्याचे आवाहन केले. भारताचे दोन युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि यशस्वी जयस्वालचे प्रशिक्षक ज्वाला सिंह यांनी नवभारत टाइम्सला सांगितले की, अशा कठीण प्रसंगी आम्ही लोकांची मदत करत आहोत. ही गोष्टी आम्ही कोणाशी शेअर न करण्याचे ठरवले होते. जे गरजू लोक आहेत त्यांना आम्ही मदत करत होतो. पण नंतर या अभियानात इतर लोकांना सहभागी करून घेण्याचे ठरवले.
वाचा-
मुंबईत क्लबसह अनेक स्टेडियममधील काम बंद आहे. त्यामुळेच आम्ही ग्राऊड स्टाफची मदत करण्याचे ठरवले. ते आपल्यासाठी किती मेहनत घेतात. हीच वेळ आहे त्यांच्यासाठी काही तरी करण्याची. आम्ही राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या निमयांचे पालन करून ४० स्टेडियममधील ग्राऊड स्टाफची मदत केली. या सर्वांना आम्ही रेशनचे पॅकेट दिले, असे यशस्वीने सांगितले.
गुरू-शिष्याच्या या जोडीने सांगितले की, या काळात आपण सर्वांनी मिळून करोना व्हायरसचा पराभव करायचा आहे. तुमच्या आजूबाजूला जर कोणी गरजू असेल तर त्यांना मदत करा. सर्वात म्हत्त्वाचे स्वत:ची काळजी घेऊन तुम्ही ही गोष्ट करू शकता.
वाचा-
देशातील लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा यशस्वी सर्वात युवा फलंदाज आहे. गेल्या वर्षी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून खेळताना त्याने झारखंडविरुद्ध १५४ चेंडूत १२ षटकार आणि १७ चौकारांसह २०३ धावा केल्या होत्या.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times