किंग्सटन: जमैकाचा महान धावपटू याला झाले आहे. बोल्टची पत्नी केनी बेटनने मुलीला जन्म दिला. जमैकाचे पंतप्रधान अॅड्र्यू होलनेस यांनी सोशल मीडियावरून बोल्टचे मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

वाचा-
आपला महान धावपटू उसेन बोल्ट आणि केसी बेनेट यांना मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन, असे पंतप्रधान होलनेस यांनी म्हटले आहे. स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार बोल्टला रविवारी मुलगी झाली. या संदर्भात अन्य कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही.

वाचा-

३३ वर्षीय बोल्टने मार्च महिन्यात सोशल मीडियावर केनी बाळाला जन्म देणार असल्याचे सांगितले होते. बोल्ट-केनी यांचे हे पहिलेच बाळ आहे.

वाचा-

जगातील सर्वात वेगवान धावपटू अशी ओळख असलेल्या बोल्टने ऑलिंम्पिकमध्ये आठ सुवर्णपदक मिळवली आहेत. १०० आणि २०० मीटरमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. एक दशक आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण केल्यानंतर २०१७ मध्ये त्याने निवृत्ती घेतली होती.

ऑलिंम्पिकच्या इतिहासात २०१६ मध्ये १०० आणि २०० मीटर स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्णपदक जिंकणारा तो एकमेव धावपटू ठरला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here