वाचा-
चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही गोष्टींना दिलासा देण्यात आला आहे. त्यामध्ये क्रीडा स्टेडियम आणि क्रीडा संकुलांसाठीही एक आनंदाची बातमी आहे. कारण आता या दोन्ही गोष्टी खुल्या होऊ शकतात. पण त्याचबरोबर स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्यास मात्र बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देता येऊ शकत नाही.
याबाबत शोएब म्हणाला की, ” प्रेक्षकांविना सामने खेळवणे हे क्रिकेट मंडळांसाठी चांगले होऊ शकते. पण प्रेक्षकांविना खेळवण्यात येणाऱ्या सामन्यांना मजा येणार नाही. खेळासाठी चाहते आणि प्रेक्षक हे गरजेचे आहेत. प्रेक्षकांविना सामना खेळवणे म्हणजे वधू शिवाय लग्न करण्यासारखे आहे.”
वाचा-
करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या गोष्टीचा फटका क्रीडा क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. सध्याच्या घडीला भारतात एकही स्पर्धा सुरु नाही. काही स्पर्धा रद्द तर काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता हे नुकसान भरून काढायचे असेल तर काही स्पर्धा सुरु करायला हव्यात, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.
यंदाची आयपीएल २९ मार्चला सुरु होणार होती. पण लॉकडाऊनमुळे ती पुढे ढकलण्यात आली. आता तर आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आता आयपीएल कधी होणार, याबाबत कोणीही सांगू शकत नाही. पण चौथ्या लॉकडाऊनमध्ये स्टेडियम खुले करण्याचा निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे काही दिवसांत आयपीएलबाबत काही घोषणा होण्यची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times