महाराष्ट्राची धावपटू प्राजक्ता गोडबोलेपुढे या लॉकडाऊनमध्ये जगायचे कसे, हा प्रश्न उपस्थित झाला होता. ही बातमी महाराष्ट्र टाइम्स.कॉमने दिली होती. अखेर प्राजक्ताला उद्धव ठाकरे यांच्याकडून आज मदत मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे.
वाचा-
लॉकडाऊनमुळे या प्राजक्ताच्या आईचा रोजगार गेला होता. त्याचबरोबर वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे घरात कमावतं कोणीच नाही. त्यामुळे दोन वेळची पोटाची खळगी कशी भरायची, हा प्रश्न याप्राजक्ताच्या कुटुंबियांना पडलेला होता. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना आता मदत केल्याचे समोर आले आहे.
प्राजक्ताची सर्व हकीकत उद्धव ठाकरे यांनी जाणून घेतली आणि तिला मदत करायचे ठरवले. प्राजक्ता ही नागपूरला राहते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नागपूरमधील शिवसेनेच्या शहर प्रमुखाला फोन केला आणि प्राजक्ताला सर्वतोपरी मदत करण्याचे सांगितले.
पीटीआयला नागपूरचे शिवसेनेचे शहर प्रमुख प्रकाश जाधव यांनी सांगितले की, ” उद्धव ठाकरे यांना प्राजक्ताची परिस्थिती समजली. त्यानंतर त्यांनी नागपूरच्या पदाधिकाऱ्यांना फोन केला आणि प्राजक्ताला सर्वतोपरी मदत करण्याचे सांगितले. त्यानुसार आम्ही प्राजक्ताला अन्न-धान्याची मदत केली आहे. त्याचबरोबर प्राजक्ताला १६ हजार रुपयांची मदतही केली आहे. फक्त एवढ्यापुरती आमची मदत मर्यादीत नाही. कारण आम्ही प्राजक्ताच्या संपर्कात आहोत. यापुढे कोणतीही मदत प्राजक्ताला लागली तर त्यासाठी आम्ही तत्पर आहोत.”
प्राजक्ताने इटलीमध्ये २०१९ साली झालेल्या मॅरेथॉनमध्ये तिने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याचबरोबर भुवनेश्वरर येथे झालेल्या अर्ध मॅरोथॉनमध्ये तिने दुसरे स्थानही पटकावले होते. भारताला आगामी काळात ऑलिम्पिकच्या पदकाची आशा तिच्यापासून आहे. खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी पोषण आहार हवा असतो, पण इथे प्राजक्तावर उपासमारीची वेळ आली होती, पण अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिला मदत केली आहे. यापुढेही प्राजक्ताला त्यांच्याकडून मदत मिळणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times