हे मजूर आपल्या गावी चालत जात असताना त्यांच्या जेवणाचे हाल होतात. त्याचबरोबर उन्हाळा सुरु आहे, त्यामुळे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोयही भाग नाही. त्याचबरोबर काही मजूर तर अनवाणी पायाने चालत जात आहे. या सर्वांना या क्रिकेटपटूने मदत केल्याचे पाहायला मिळाले आहे.
मजूरांची भूक शमवण्यासाठी त्याने ५० किलो गव्हाचे पीठ घेतले आणि त्याच्या पुऱ्या घरच्यांसहीत शेजाऱ्यांना बनवायला सांगितल्या. त्याचबरोबर भाजीही तयार केली आणि त्याचे एक पॅकेट बनवून या मजूरांना दिली. त्याचबरोबर या मजूरांच्या मुलांसाठी दूधाची व्यवस्थाही या क्रिकेटपटूने केली आहे. या मजूरांना तहान लागत असल्यामुळे त्यांना सरबतही तो देत असल्याचे पुढे आले आहे. त्याचबरोबर अन्य बरीच मदत तो मजूरांना करत असल्याचे समोर आले आहे.
हा क्रिकेटपटू आहे तरी कोण…तब्बल दहा हजान मजूरांना मदत करणारा हा क्रिकेटपटू आहे तरी कोण, असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. हा क्रिकेटपटू आहे आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू तजिंदर सिंग ढिल्लोन. आतापर्यंत त्याने स्थलांतरीत मजूरांना भरपूर मदत केली आहे.
याबाबत तजिंदर म्हणाला की, ” माझे घर हायवे पासून जवळ आहे. या रस्त्यावरून काही स्थलांतरीत मजूर जाणार असल्याचे वृत्त मला समजले. तेव्हा मी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना खायला अन्न आणि पाणी मिळत नव्हते. त्याचबरोबर त्यांच्या मुलांचेही हाल होत होते. या सर्व समस्या जाणून घेतल्यावर मी कामाला लागलो आणि माझ्यापरीने त्यांना मदत केली. यामध्ये माझ्या एकट्याचा वाटा नाही. तर कुटुंबियांबरोबर मित्रपरीवार आणि शेजाऱ्यांनीही या कार्यात मला मदत केली आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times