भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा लॉकडाऊनमध्ये एक नवीन अवतार पाहायला मिळाला आहे. सचिनच्या या नव्या अवताराचा व्हिडीओ सोशल मीडियावर आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

सचिनने लॉकडाऊनच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारला मदत केली आहे. त्याचबरोबर आपल्या चाहत्यांना करोनापासून कसे वाचायचे, याचेही उपाय त्याने सांगितले आहेत. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने दिलेले एक चॅलेंजही सचिनने पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वच खेळाडू सध्या घरी आहेत. सचिनही सध्या घरीच आहे. पण आता घरातच त्याचा नवीन अवतार पाहायला मिळाला आहे. सचिनचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

लॉकडाऊनमध्ये काही दुकानं उघडली आहेत. पण काही दुकानं अजूनही बंद आहेत. भारतातील सलून अजूनही सुरु झालेली नाहीत. त्यामुळे बऱ्याच जणांना आता केस कापण्याची समस्या जाणवत आहे. हीच समस्या सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरलाही जाणवली. या समस्येवर नेमके काय करायचे, याचा विचार तो करत होता. पण यावेळी त्याची मदत केली सचिनने. सचिन यावेळी आपल्या मुलाच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले असून तुम्ही व्हायरल झालेला व्हिडीओ पाहा…

सचिनने नेमके काय केले…सचिनने यावेळी घरातच अर्जुनचे केस कापायला घेतले. सुरुवातीला अर्जुनला ही गोष्ट खरी असल्याचे वाटत नव्हते. पण सचिनचा एक नवीन अवतार यावेळी त्यालाही पाहायला मिळाला. सचिनने या गोष्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

याबाबत सचिनने इंस्टाग्रामवर सांगितले आहे की, ” एक वडिल म्हणून आपल्या मुलाच्या काही गोष्टी कराव्या लागतात. लहान मुलांबरोबर जिम करणे असो, खेळणे असो किंवा त्यांचे केस कापणे असो. या हेअरकटमध्ये अर्जुन हँडसम दिसत आहे. अर्जुनचे केस कापण्यामध्ये मला एक असिस्टंट मिळाली होती, ती म्हणजे माझी मुलगी सारा. या कामासाठी साराचेही धन्यवाद.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here