वाचा-
युवराज सिंग- भारताचा सिक्सर किंग अशी ओळख असलेल्या युवराज सिंगला फेअरवेल मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. खराब कामगिरीमुळे युवराज सिंग संघाबाहेर झाला आणि त्यानंतर ते पुन्हा कधीच संघात स्थान मिळूव शकला नाही. यामुळेच त्याला फेअरवेल मॅच खेळता आली नाही. युवराज भारताच्या २००७च्या टी-२० वर्ल्ड कप आणि २०११च्या वर्ल्ड कप विजेत्या संघात होता. या दोन्ही स्पर्धेत त्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. २०११च्या वर्ल्ड कपमध्ये तो कॅन्सरशी लढत होता. तरी तो देशासाठी खेळला. कॅन्सरवर मात करून युवराज पुन्हा मैदानात आला. त्यानंतर तो संघाच्या आत बाहेर राहिला. युवीने भारताकडून ३०४ वनडे आणि ४० कसोटी खेळल्या आहेत. याशिवाय ५८ टी-२० सामने खेळले. २०१९ साली त्याने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
वाचा-
विरेंद्र सेहवाग- भारताचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागला फेअरवेल मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. युवराज प्रमाणेच तो देखील भारताच्या दोन वर्ल्ड विजेत्या संघाचा सदस्य होता. २००७चा टी-२० आणि २०११च्या वर्ल्ड कप विजेत्या संघात सेहवाग होता. सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात मोठी खेळी केली आहे. २००८ मध्ये चेन्नई टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३१९ धावा केल्या होत्या. भारताकडून सेहवाग २०१३ मध्ये अखेरची मॅच खेळला होता. बीसीसीआयने २०१५ मध्ये फिरोजशाह कोटला मैदानावर फेअरवेल स्पीच देण्यासाठी बोलवले होते आणि त्याचा सत्कार देखील केला.
गौतम गंभीर- भारतीय संघाने जेव्हा २०११ साली वर्ल्ड कप फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते तेव्हा गंभीरने अंतिम सामन्यात ९७ धावा केल्या होत्या. गंभीरच्या त्या खेळीमुळे भारताला फायनल मॅच जिंकता आली. २००७च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये देखील गंभीरने शानदार फलंदाजी केली होती. अशा कामगिरीनंतर देखील गंभीरला फेअरवेल मॅच खेळता आली नाही. करिअरच्या अखेरीस जेव्हा त्याचा फॉर्म खराब झाला तेव्हा तो संघातून बाहेर झाला. त्यानंतर त्याने आयपीएलमधून चांगली कामगिरी केली होती.
वाचा-
व्हीव्हीएस लक्ष्मण- भारताच्या या महान खेळाडूला फेअरवेल मॅच खेळता आली नाही. २००१ साली कोलकाता कसोटी लक्ष्मणने २८१ धावांची ऐतिहासिक खेळी केली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही एक सर्वोत्तम खेळी मानली जाते. नव्या खेळाडूंना संधी देण्यासाठी लक्ष्मण स्वत: क्रिकेटपासून दूर झाला. २०१२ साली त्याने अखेरची कसोटी खेळली होती. त्याने भारताकडून कसोटीत १७ तर वनडेत ६ शतक केली आहेत.
जहीर खान– भारताच्या दिग्गज जलद गोलंदाजांमध्ये जहीर खानचा समावेश होतो. पण त्याला देखील फेअरवेल मॅच खेळता आली नाही. जहीरने भारताकडून ९२ कसोटी आणि २०० वनडे सामने खेळले आहेत. जहीर हा कपील देव यांच्यानंतर भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. २०११च्या वर्ल्ड कप विजयात जहीरची भूमिका महत्त्वाची होती. या स्पर्धेत त्याने २१ सर्वाधिक २१ विकेट घेतल्या होत्या. त्याने भारताकडून अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच २०१४मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळली होती
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times