Authored by prasad lad | Maharashtra Times | Updated: Aug 4, 2022, 1:46 AM

भारताच्या क्रिकेट संघाने यावेळी १०० धावांनी दणदणीत विजय साकारला. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघाचा ६२ धावांत खुर्दा उडवण्याची किमयाही साकारली. भारताच्या क्रिकेट संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कमाल केली. भारताच्या संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत आपली गाडी रुळावर आणली होती. त्यानंतर आज भारतीय संघाने पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे.

 

womens cricket
बर्मिंगहम : भारताच्या क्रिकेट संघाने पुन्हा एकदा कमाल करत थेट उपांत्य फेरी गाठली आहे. भारताच्या महिला संघाने पाकिस्ताननंतर आज बार्बाडोसवर दणदणीत विजय साकारला. भारताने प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजपुढे १६३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या बार्बाडोसच्या संघाला भारताने फक्त ६२ धावा करू दिल्या आणि १०० धावांनी दणदणीत विजय साकारला.

भारताला या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीलाच मोठा धक्का बसला होता. कारण भारताची सलामीवीर स्मृती मानधना ही पाच धावांवर बाद झाली. पण त्यानंतर मात्र जेमिमा रॉड्रिगेस आणि शेफाली वर्मा यांनी भारतासाठी दमदार भागादारी रचली. या दोघांनी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचली. यावेळी शेफाली बाद झाल्यामुळे ही जोडी फुटली. शेफालीने यावेळी तुफानी फटकेबाजी करत २६ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४३ धावांची खेळी साकारली. शेफाली बाद झाली असली तरी त्यानंतर जेमिमाने मात्र भारताच्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. जेमिमाने यावेळ अर्धशतक साकारत भारताला सहजपणे दीडशे धावांचा पल्ला गाठून दिला. जेमिमाने यावेळी ४६ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटाकारच्या जोरावर नाबाद ५६ धावांची खेळी साकारली. जेमिमाच्या या अर्धशतकी खेळीमुळेच भारताला १६२ धावांपर्यंत मजल मारता आली.

भारताच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बार्बाडोसच्या संघाला यावेळी रेणुका सिंगने एकामागून एक चार धक्के दिले. रेणुकाने यावेळी चार धक्के दिल्यामुळे बार्बाडोसचे कंबरडे मोडले गेले आणि तिथेच त्यांनी हा सामना गमावला होता. रेणुकाने यावेळी चार षटकांमध्ये फक्त १० धावा देत चार विकेट्स पटकावल्या. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी ही सुवर्णसंधी सोडली नाही. त्यांनी अचूक आणि भेदक मारा करत बार्बाडोसच्या धावसंख्येला चांगलेच वेसण घातले. त्यामुळेच बार्बाडोसच्या संघाने २० षटकांत ८ विकेट्स गमावत फक्त ६२ धावा करता आल्या आणि भारताने १०० धावांनी विजय साकारला.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here