सिडनी: काही खेळाड हे मैदानावरील कामगिरीमुळे चर्चेत येतात. तर काही मैदाना बरोबर मैदानाबाहेरील कामगिरीमुळे चर्चेत असतात. सध्या लॉकडाऊनच्या काळात क्रिकेट स्पर्धा स्थगित झाल्यामुळे खेळाडू घरी कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत.अनेक क्रिकेटपटू सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आहेत. अशाच व्हिडिओमुळे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज चर्चेत आला आहे. वॉर्नर सोशल मीडियावर टिकटॉकचे व्हिडिओ शेअर करत असतो.

वाचा-
वॉर्नरच्या व्हिडिओमध्ये त्याची पत्नी कॅडिस आणि मुली देखील दिसतात. वॉर्नर आणि कॅडिस यांचा विवाह २०१५ साली झाला. या दोघांची खास अशी आहे. वॉर्नर अॅशेस मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला गेला होता. तेव्हा कॅडिसने त्याला ट्विटरवर मेसेज पाठवला. त्यानंतर दोघांचे नियमीत बोलणे सुरू झाले. दोघांची मैत्री झाल्यानंतर लग्नाबाबत वॉर्नर गंभीर नव्हता. पण नंतर तो लग्नासाठी तयार झाला.

वाचा-
वॉर्नरची पत्नी कॅडिस एक अॅथलिट आणि सुपरमॉडल होती. तिला ऑस्ट्रेलियाची आयर्नवुमन म्हटले जात असे. वॉर्नरच्या प्रेमात पडण्याआधी कॅडिस आणि रग्बी खेळाडू सोन बिल विलियम्स यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. विशेष म्हणजे २०१५ साली वॉर्नस सोबत विवाह करण्याआधी कॅडिस त्याच्या मुलाची आई झाली होती. या दोघांना ३ मुली आहेत. वॉर्नरच्या व्हिडिओत या तिघी मुली नेहमी दिसतात.

वाचा-
बॉल टेंपरिंग प्रकरणात जेव्हा वॉर्नर विरुद्ध आरोप सिद्ध झाले आणि त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली तेव्हा कॅडिसने त्याला मोठा आधार दिला. या सर्व प्रकरणातून वॉर्नर बाहेर पडला आणि पुन्हा क्रिकेट मैदानावर यशस्वी ठरला.

वॉर्नरने ऑस्ट्रेलियाकडून ८४ कसोटी सामन्यात २४ शतकांसह ७ हजार २४४ धावा केल्या आहेत. तर १२३ वनडे सामन्यात १८ शतक आणि २१ अर्धशतकांसह ५ हजार २६७ धावा केल्या. आयपीएलमध्ये वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार असून २०१६ मध्ये त्याने विजेतेपद मिळवून दिले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here