नवी दिल्ली: भारताच्या रॉबिन उथप्पाने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये फक्त ३ चेंडू टाकले आहेत. यातील दोन चेंडू वनडे क्रिकेटमध्ये टाकले तर तिसरा चेंडू २००७च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेत टाकला होता.

२००७च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत यांच्यातील सामना बॉल आऊटपर्यंत गेला. तेव्हा भारताने पाकिस्तानचा ३-० असा पराभव करत विजय मिळवला होता. या बॉल आऊटमध्ये एक चेंडू रॉबिन उथप्पाने टाकला होता.

वाचा-
पाकिस्तानविरुद्धच्या बॉल आऊट सामन्यातील विजयाचे संपूर्ण श्रेय कर्णधार महेंद्र सिंह धोनीला जाते, असे उथप्पाने सांगितले. या सामन्यात दोन्ही संघांनी १४१ धावा केल्या. त्यामुळे विजेता कोण याचा निर्णय बॉल आऊटवर घेण्याचे ठरले. ईश सोढी सोबत पॉडकास्टवर बोलताना उथप्पा म्हणाला, जेव्हा पाकिस्तानचे गोलंदाज चेंडू टाकत होते तेव्हा त्यांचा विकेटकिपर कामरान अकमल विकेटच्या मागे नॉर्मल विकेटकिपर जसा उभा राहतो तसा उभा राहिला. पाककडून उमर गुल, याशिर अराफात आणि शाहित आफ्रिदी यांनी चेंडू टाकले पण एकाचाही चेंडू विकेटला लागला नाही.

वाचा-
भारतीय गोलंदाज जेव्हा चेंडू टाकत होते. तेव्हा धोनी विकेटच्या मागे जाऊन बसला. त्यामुळे आमचे काम सोपे झाले. आम्हाला फक्त धोनीवर चेंडू टाकायचा होता आणि आम्ही चेंडू बरोबर मारले. भारताने जे तीन चेंडू टाकले त्यात माझ्या एका चेंडूचा समावेश होता, असे उथप्पाने सांगितले.

वाचा-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील भारताचा हा पहिला विजय होता. या सामन्यात भारताला विजय मिळाला असला तरी पाकचा जलद गोलंदाज मोहम्मद आसिफला सामनावीर पुरस्कार मिळाला. त्याने चार विकेट घेतल्या होत्या. उथप्पाने या सामन्यात ३९ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावा केल्या होत्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here