इस्लामाबाद: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू गेल्या काही दिवसांपासून बेताल वक्तव्य करून लोकप्रियता मिळवत आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या आफ्रिदीने आता आणखी एक वक्तव्य केले आहे. काश्मीरच्या जनतेला भडकावणाऱ्या आफ्रिदीने आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे अजब मागणी केली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

वाचा-

दोनच दिवसांपूर्वी आफ्रिदीने PM मोदींवर टीका केली होती. तो म्हणाला होता की, सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरस पसरलेला आहे. पण या करोना व्हायरसपेक्षा मोठा आजार मोदी यांच्या डोक्यामध्ये आहे. मोदी यांना धर्माचा आजार झाला आहे. धर्माच्या नावावर ते राजकारण करत आहेत. मोदी हे काश्मीरी लोकांवर अत्याचार करत आहेत. मोदी स्वत:ला दिलदार असल्याचे दाखवतात, पण ते फार मोठे डरपोक आहेत. त्यामुळेच फक्त काश्मीरमध्ये त्यांनी सात लाखांचे सैन्य उभे केलेले आहे. सात लाखाचे सैन्य तर आमच्या देशामध्ये आहे आणि त्यांच्यामागे २३ कोटी जनता उभी आहे.

वाचा-
आता त्यापुढे जाऊन आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला आहे. एका ठिकाणी बोलताना आफ्रिदी म्हणाला, मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सांगू इच्छीतो की जेव्हा पुढच्यावेळी पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचे आयोजन केले जाईल तेव्हा त्यात एका नव्या संघाचा समावेश केला जावा. हा संघ काश्मीरचा असेल. या टीमकडून अखेरचा क्रिकेट सामना कर्णधार म्हणून खेळण्यास मला आवडले. मी पीसीबीला विनंती करतो की, पुढचा संघ काश्मीरचा असावा.

वाचा-
लोकांसमोर बोलताना आफ्रिदीला याचे देखील भान राहिले नाही की जो भाग पाकिस्तानचा नाही आणि त्यांच्या ताब्यात देखील नाही, अशा एका प्रदेशाच्या क्रिकेट संघाची तो मागणी करत आहे.

वाचा-

वाचा-
काश्मीर बद्दल आणि PM मोदींवर टीका केल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी त्याच चांगलाच समाचार घेतला होता. युवराज सिंह, गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांनी त्याला सुनावले होते. हरभजनने तर आफ्रीदी मैत्रीच्या लायक नसल्याचे म्हटले होते.

वाचा-
फक्त क्रिकेटपटू नाही तर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही आफ्रिदीची सोशल मीडियावर खिल्ली उडवली होती. जावेद अख्तरांनी ट्वीट करत म्हटले होते की, ‘मी शाहिद आफ्रिदीचा उपदेश पाहिला. ते खरंच मजेशीर होते. धर्म आणि राजकारणाला एकत्र केलं जाऊ नये यावर तो ज्ञान देतोय. एक म्हण आहे, दुसऱ्यांच्या डोळ्यात एखादी काडी खटकणाऱ्या लोकांना स्वतःच्या डोळ्यातली मोठेच्या मोठे लाकूड घुसलेले दिसत नाही.’

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here