भारतामध्ये चौथ्या लॉकडाऊनमध्ये क्रीडा क्षेत्राला दिलासा मिळेल, असे म्हटले गेले होते. त्यानंतर आता बीसीसीआयटने कंबर कसली आहे आणि आयपीएल भरवण्यासाठी त्यांनी काही ठोस पावले उचलली आहे. आयपीएलच्या तारखाही जाहीर केल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर बीसीसीआयच्या अपेक्स कौन्सिलच्या सदस्यांनेही आयपीएल कोणत्या कालावधीत होऊ शकते, याबाबत भाष्य केले आहे.

यंदाची आयपीएल ही २९ मार्च पासून सुरु होणार होती. पण लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर १५ एप्रिलला बीसीसीआयने आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. पण आयपीएलचे आयोजन करण्याबाबत आता विचार सुरु झाला आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने आयपीएलशी निगडीत काही व्यक्तींनाही याबबात माहिती दिल्याचे समजते आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि विद्यमान अपेक्स कौन्सिलचे सदस्य अंशुमन गायकवाड यांनी याबाबत आज काही महत्वाचे वक्तव्य केले आहे. आयपीएलसाठी कोणता कालावधी हा चांगला असेल, याबाबत त्यांनी भाष्य केले आहे.

यंदा आयपीएल ही २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या कालावधीमध्ये होऊ शकते, असे IANSने सांगितले आहे. पण महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम या वृत्ताची जबाबदारी घेत नाही. बीसीसीआयने आयपीएलच्या संघ मालकांनाही कल्पना दिल्याचे समजत आहे. पण आयपीएल खेळवण्यासाठी बीसीसीआयला काही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. भारतातील परिस्थिती नेमकी कशी असेल, यावर आयपीएलचे भवितव्य अवलंबून असल्याचे म्हटले जात आहे.

याबाबत अंशुमन गायकवाड म्हणाले की, ” यावर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. पण या स्पर्धेबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. ही स्पर्धा जर झाली नाही तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयपीएल खेळवले जाऊ शकते. पण त्यासाठी भारतामधील वातावरण नेमके कसे आहे, हे पहिल्यांदा पाहावे लागेल. भारतामध्ये क्रिकेट कधी सुरु होईल, हे कोणी सांगू शकत नाही. कदाचित या गोष्टीला दोन किंवा चार महिनेही लागू शकतात. भारतातील परिस्थितीवर ते अवलंबून असेल. पण जर स्पर्धा खेळवायची झाली तर त्यासाठी मानसीकरीत्या सक्षम असणे गरजेचे आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here