क्रिकेट मंडळात तब्बल पाच लाख डॉलरचा घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट एका खेळाडूने नुकताच केला आहे. माजी खेळाडूंसाठी देण्यात येणाऱ्या निधाची गैरवापर झाल्याचे आता उघड झाले असून आता या क्रिकेट मंडळावर बीसीसीआय कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

माजी क्रिकेटपटूंकडे उत्पन्नाचे साधन नसते. त्यांच्यावर वाईट वेळ येऊ नये, यासाठी तब्बल पाच लाख डॉलर हे क्रिकेट मंडळाला देण्यात आले होते. त्यानंतर या क्रिकेट मंडळाचे ऑडीटही करण्यात आले, यामधूनच हा घोटाळ समोर आला आहे.

बीसीसीआयने २०१३-१४ या वर्षात वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाला पाच लाख डॉलर एवढी रक्कम दिली होती. ही रक्कम माजी खेळाडूंना मदत करण्यासाठी दिली होती. पण या रक्कमेच्या एक टक्काही कोणत्या माजी क्रिकेटपटूला मिळालेला नाही. त्यामुळे हा मोठा घोटाळा आता उघड झाला आहे. हा घोटाळा आता बाहेर कसा काढणार आणि बीसीसीआय वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळावर कोणताही कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. जर अन्य क्रिकट मंडळ मदतीचा असा दुरुपयोग करत असतील तर यापुढे त्यांना मदत करायची की नाही, याचा विचारही आता बीसीसीआयला करावा लागणार आहे.

वेस्ट इंडिजचे माजी महान क्रिकेटपटू मायकेल होल्डिंग यांनी हा खुलासा केला आहे. होल्डिंग यांनी सांगितले की, ” बीसीसीआयने पाच लाख डॉलर एवढी मोठी रक्कम वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाला दिली होती. ही रक्कम माजी क्रिकेटपटूंना मदत करण्यासाठी देण्यात आली होती. मला या रक्कमेची गरज नाही. पण जे गरजू माजी क्रिकेटपटू आहेत त्यांच्यापर्यंत ही रक्कम पोहोचलेलीच नाही. या पैशाचे क्रिकेट मंडळाने नेमके काय केले, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या वर्षी ऑडीट करण्यात आले होते. पण हे ऑडीट सार्वनजिक करण्यात आलेले नाही. हे ऑडीच ६० पानांचे आहे, ते जर पाहिले गेले तर हा घोटाळा नक्कीच सर्वांसमोर येईल. येत्या काही दिवसांत क्रिकेट मंडळाचीही काळी बाजू मी सर्वांसमोर आणणार आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here