करोना व्हायरसमुळे सर्व खेळाडू आतापर्यंत आपल्या घरीच होते. दोन महिने लॉकडाऊनमध्ये राहून त्यांनाही कंटाळा आला आहे. त्याचबरोबर करोना व्हायरसमुळे क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे इंग्लंडच्या विश्वविजेत्या संघाचे गुरुवापासून मैदानात उतरण्याचे ठरवले आहे.

करोना व्हायरसमुळे जग ठप्प झाले होते. पण आता करोना व्हायरसला सोबत घेऊनच जगावे लागणार, असे म्हटले जात आहे. कारण करोना व्हायरसमुळे किती दिवस घरात बसणार, हा प्रश्नही बऱ्याच जणांना पडलेला आहे. त्यामुळे आता करोना व्हायरस असला तरी त्याच्याबरोबर राहूनच दोन हात करण्याचा निर्णय काही लोकांनी घेतलेला आहे.

इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने धाडस दाखवत एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार इंग्लंडच्या संघातील काही खेळाडू गुरुवारपासून मैदानात सरावासाठी उतरणार आहेत. करोना व्हायरसशी लढण्यासाठी सुरक्षिततेचे उपाय इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने घेतले आहेत.

सध्याच्या घडीला इंग्लंडचे गोलंदाज सराव करण्यासाठी उतरणार आहेत. त्यानंतर १ जूनपासून इंग्लंडचे फलंदाज आणि यष्टीरक्षक सरावासाठी मैदानात येणार आहे. इंग्लंडमधील क्रिकेटची सर्व मैदानं खुली करण्यात येणार आहेत. इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने आपल्या खेळाडूंसाठी खास प्लॅन बनवला आहे. त्या प्लॅननुसार आता खेळाडू सरावासाठी मैदानात उतरणार आहेत.

जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड ही इंग्लंडची वेगवान गोलंदाजांची जोडी क्रिकेट जगतामध्ये प्रसिद्ध आहे. ही जोडी पहिल्यांदा आपल्या स्थानिक संघांसाठी सराव करायला उतरणार आहेत. इंग्लंडमध्ये क्रिकेटचे सामने १ जुलैनंतर सुरु करण्यात येणार आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here