ऑस्ट्रेलियामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबरपासून होणार आहे. ही स्पर्धा होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पण या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या एका संघात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनील स्थान न दिल्यामुळे चाहते चांगलेच भडकलेले पाहायला मिळत आहेत.

काही दिवसांपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने आपला विश्वचषकासाठीचा संघ जाहीर केला होता. या संघात आकाशने धोनीला स्थान दिले नव्हते. त्यामुळे आता चाहते त्याच्यावर चांगलेच भडकलेले पाहायला मिळत आहेत.

धोनी पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करेल, असे आकाशला वाटत नाही. त्यामुळे त्याने निवडलेल्या विश्वचषकाच्या संघात धोनीला स्थान दिले नव्हते. धोनीच्या जागी आकाशने विश्वचषकाच्या संघात रिषभ पंतला स्थान दिले होते. त्यानंतर धोनीचे चाहते आकाशवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळत आहेत.

याबाबत आकाश चौप्राने भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरला सांगितले की, ” धोनीला संघात न घेतल्यामुळे माझ्यावर लोकांनी भरपूर टीका केली आहे. काही टीकाकारांनी तर माझ्या मुलांनाही नाही सोडले. त्यामुळे मी या चाहत्यांना सांगू इच्छितो की, मला माफ करा. ती गोष्ट घडून गेली आहे, त्यामुळे त्या गोष्टीवर आता भाष्य करणे योग्य नाही.”

आकाश पुढे म्हणाला की, ” क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायची की नाही, हा धोनीचा निर्णय असेल. त्याला संघात घ्यायचे की नाही हा निवड समितीचा निर्णय असेल. धोनी किती फिट आहे, यावर त्याला संघात स्थान द्यायचे की नाही, हे ठरवावे लागणार आहे. धोनी एक वर्ष संघाच्या बाहेर आहे, त्यामुळे त्याला संघात पुनरागमन करणे सोपे नसेल. धोनी आणि निवड समिती यांच्यामध्ये नेमका काय ंवाद झाला आहे, हे अन्य कोणालाही माहिती नाही. पण वर्षभरापासून क्रिकेटपासून लांब असलेल्या खेळाडूला संघात पुनरागमन करणे कठीण असते. संघात पुनरागमन करताना या खेळाडूचा फिटनेस कसा आहे, याकडे लक्ष देणे गरजेचे असते.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here