मुंबई: करोना व्हायरस रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून राज्य सरकारने काही प्रमाणात सवलत दिली आहे. यामुळे नागरिकांना काही गोष्टींसाठी घराबाहेर पडता येईल. याच बरोबर सर्वांना प्रतिक्षा आहे ती क्रीडा स्पर्धा कधी सुरू होतील. करोनामुळे सर्व स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयने द्विपक्षीय क्रिकेटसह आयपीएल देखील पुढे ढकलली होती.

लॉकडाऊनमध्ये सवलत दिल्यानंतर राज्य सरकारने ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये खेळाडूंना वैयक्तीक ट्रेनिंग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. अर्थात या ट्रेनिंगमध्ये खेळाडूंना स्टेडियममध्ये जाता येणार असले तरी तेथे प्रेक्षक जाऊ शकणार नाहीत. भारताचे दोन क्रिकेटपटू मात्र लॉकडाऊनच्या सवलतीचा फायदा घेऊ शकणार नाहीत.

वाचा-
भारताचा वनडे संघाचा उपकर्णधार आणि कसोटी संघाचा उपकर्णधार हे दोघे जण मुंबईतील रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे या दोघांना शहरातील वैयक्तीक ट्रेनिंग सुरू करता येणार नाही.

वाचा-
मुंबई क्रिकेट संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही स्टेडियम आणि खेळाच्या सुविधा देण्याबाबत राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करत आहोत. एमसीएकडे तीन ग्राऊंड आहेत. यात वानखेडे, वांद्रे-कुर्ला परिसर आणि सचिन तेंडुलकर जिमखाना याचा समावेश आहे. पण सरकारच्या आदेशानुसार हे सर्व बंद आहेत.

मुंबईतील ब्रेबोर्न स्टेडियमवर सराव सुरू करता येत नाही. हे स्टेडियम मरीन ड्राइव्ह जवळ आहे. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया(सीसीआय)च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की जोपर्यंत सरकारचे आदेश येत नाहीत तोपर्यंत क्रिकेट सुरू करता येणार नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here