नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक झळकावणाऱ्या भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आजच्या दिवशी एका फलंदाजाचे द्विशतक करण्याचे स्वप्न भंग केले होते. पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज सईद अन्वरने आजच्या दिवशी १९९७ साली वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला होता. चेन्नईत झालेल्या या सामन्यात अन्वरने भारताविरुद्ध धावांची खेळी केली होती.

वाचा-
अन्वरने केलेल्या १९४ धावा या तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका फलंदाजाकडून करण्यात आलेली सर्वोच्च खेळी होती. त्याने व्हीव्हीएन रिचर्ड्सच्या १८९ धावांचा विक्रम मागे टाकला होता. रिचर्ड्स यांनी १९८४ मध्ये इंग्लंडविरुद्ध ही खेळी केली होती. अन्वरने त्याच्या या खेळीत २२ चौकार आणि पाच षटकार मारले होते. त्याने अनिल कुंबळेच्या गोलंदाजीवर सलग ३ षटकार मारले होते. जेव्हा अन्वर २०० धावांच्या जवळ पोहोचला तेव्हा सचिन तेंडुलकरच्या चेंडूवर तो बाद झाला आणि सौरव गांगुलीने त्याचा कॅच घेतला होता.

वाचा-
अन्वरने १४६ चेंडूत २०६ मिनिटे फलंदाजी केली. या खेळीत अधिक वेळ शाहिद आफ्रिदीने अन्वरच्या वतीने रनर म्हणून काम केले. चेन्नईतील उष्णता आणि डाव्या हाताने फलंदाजी करण्याचा फायदा अन्वरला मिळाला. अन्वरनंतर झिम्बब्वेच्या चार्ल्स कॉन्वेट्रीने १६ ऑगस्ट २००९ रोजी त्याच्या या विक्रमाशी बरोबरी केली.

वाचा-
अन्वरच्या या खेळीने पाकिस्ताने ५० षटकात ५ बाद ३२७ धावा केल्या. गंमतीचा भाग म्हणजे पाकिस्तानकडून सर्वाच्च धावसंख्या १९४ होती तर दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या ३९ इतकी होती. भारताकडून राहुल द्रविडने १०७ आणि विनोद कांबळीने ६५ धावा केल्या. भारताला या सामन्यात ४९.२ षटकात सर्वबाद २९२ धावा करता आल्या आणि पाकने हा ३५ धावांनी विजय मिळवला.

अन्वरचा १९४ धावांचा विक्रम भारताच्या सचिन तेंडुलकरने २०१० मध्ये द्विशतक करत मागे टाकला. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्वालियर येथे ही खेळी केली. पुरुषांच्या वनडेत द्विशतक करणारा सचिन पहिला फलंदाज होता. अर्थात सचिनच्या आधी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ब्लॅडा क्लार्कने १६ डिसेंबर १९९७ रोजी १५५ चेंडूत २२९ धावांची खेळी केली होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here