सध्याच्या घडीला करोन व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वच खेळाडू आपल्या घरी आहेत. पण या गोष्टीला अपवाद ठरला आहे तो भारताचा एक खेळाडू. कारण हा खेळाडू चक्क मैदानात उतरला असून तो सराव करताना दिसत आहे. या खेळाडूचा सराव करतानाचा व्हिडीओ खास तुमच्यासाठी…

सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे देशात सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणतेही खेळाडू सराव करताना दिसत नाही. आता घरी बसून सर्वांनाच दोन महिने झाले आहेत, अजून किती दिवस घरी बसणार हा सवाल बऱ्याच जणांना पडलेला आहे. त्यामुळे आता करोना व्हायरस असला तरी आपले आयुष्य नव्याने सुरु करायला हवे, असे काही जणांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता हा खेळाडू मैदानात उतरून सराव करत असल्याचे समोर आले आहे.

सध्याच्या घडीला खेळाडूंसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे तो फिटनेसचा. कारण जर स्पर्धा सुरु झाल्या तर त्यासाठी एवढ्या लवकर खेळाडू फिट होऊ शकत नाही. त्यामुळे या खेळाडूने सराव करायला सुरुवात केली आहे. चौथ्या लॉकडाऊनमध्ये स्टेडियम्स आणि क्रीडा संकुले खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच सर्व खेळाडू मैदानात दिसू शकतील.

हा क्रिकेटपटू आहे तरी कोण…आता मैदानात उतरलेला भारताचा हा क्रिकेटपटू आहे तरी कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. … तर हा खेळाडू आहे भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव. कुलदीपने कानपूर येथे आपला सराव सुरु केला आहे. कुलदीपला मार्गदर्शन करायला त्याचे प्रशिक्षक कपिल यादवही यावेळी त्याच्याबरोबर असल्याचे पाहायला मिळत आहे. कुलदीप यावेळी काही व्यायाम प्रकार करत आहे. या व्यायाम प्रकाराने फिटनेस वाढवण्याचा कुलदीपचा प्रयत्न आहे.

भारतातील सर्वच क्रिकेटपटूंचे लक्ष सध्या आयपीएलवर आहे. आयपीएल कधी सुरु होणार आणि त्यामध्ये आपण कधी खेळणार, याची वाट भारतीय क्रिकेटपटू पाहत आहेत. त्यामुळे आता बीसीसीआयच्या निर्णयाची सर्व क्रिकेटपटूंना उत्सुकता आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here