काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानवर हक्क सांगितला होता. त्याचबरोबर काश्मीमधील लोकांचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हाल करत आहेत, असेही त्याने म्हटले होते. पण आता पंतप्रधान जर बनवण्यात आले, तर महत्वाच्या दोन गोष्टी करेन, असे आफ्रिदीने म्हटले आहे.

एका कार्यक्रमात आफ्रिदी हा चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत होता. यावेळी आफ्रिदीला एक प्रश्न विचारण्यात आला. जर तुला दहा दिवसांसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान केले, तर तू काय करशील? या प्रश्नावर चाहत्यांना आफ्रिदीकडून आक्रमक उत्तर अपेक्षित होते. कारण यापूर्वी आफ्रिदीने आक्रमक रुप धारण करत भारताविरुद्ध गरळ ओकल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डरपोक आहेत. त्यामुळेच पाकिस्तामध्ये जेवढी आर्मी आहे तेवढी आर्मी फक्त त्यांमी काश्मीरमध्ये लावलेली आहे. मोदी यांच्या डोक्यात करोनापेक्षा मोठा आजार आहे. हा आजार धर्माचा आहे. प्रत्येक गोष्टीत ते धर्म बघत असतात. काश्मीरमधील लोकांचे ते हाल करत आहेत, असे आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते. आफ्रिदीला त्यावेळी भारताच्या क्रिकेटपटूंनी चोख उत्तर दिले होते.

पाकिस्तानचे पंतप्रधानपद सध्या माजी कर्णधार इम्रान खान यांच्याकडे आहे. पण जर तुला दहा दिवसांसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान करण्यात आले तर तू काय करशील, असे आफ्रिदीला विचारण्यात आले होते. या प्रश्नावर आफ्रिदी म्हणाला की, ” पाकिस्तानमधील बेरोजगारी हटवण्याचे काम मी करेन. त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये शिक्षणाचा प्रसार कसा केला जाईल, याकडे मी बारकाईने लक्ष देईन.”

आफ्रिदीने यापूर्वीही समाजकल्याणाचे काम केले आहे. पाकिस्तानमधील गरजूंना त्याने अन्नदान केले होते. पाकिस्तानमधील मंदीरांमध्ये जाऊन त्याने गरीब लोकांची मदतही केली होती. त्याचबरोबर आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून आफ्रिदी बरीच चांगली कामे पाकिस्तानातील जनतेसाठी करत आहे. त्यामुळेच त्याला जर तू दहा दिवसांसाठी पंतप्रधान झाला तर कोणत्या दोन गोष्टींवर जास्त भर देशील, असे विचारण्यात आले होते. त्यावर आफ्रिदीने बेरोजगार आणि शिक्षण या दोन गोष्टी बदलणार असल्याचे सांगितले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here