एक यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचे नाव नेहमीच घेतले जाते. सध्याच्या घडीला धोनी भारतीय संघात नसला तरी त्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. धोनी हा क्रिकेटपटूंना संजीवनी देतो, असे मत एका खेळाडूने व्यक्त केले आहे.

धोनीने आतापर्यंत भारताला सर्वाधिक यश मिळवून दिले आहे. त्याचबरोबर धोनीने बरेच खेळाडूही घडवलेले आहेत. कोणत्या खेळाडूला कधी संधी द्यायची आणि त्याच्याकडून चांगली कामगिरी कशी करून घ्यायची, यामध्ये धोनी माहिर आहे. धोनीने भारताला दोन विश्वचषक जिंकवून दिले आहेत. त्याबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताला जेतेपद मिळवून दिले आहे. त्याचबरोबर धोनीने कसोटी क्रमवारीत भारताला पहिल्या स्थानावर पोहोचवले होते. त्यामुळे धोनीच्या नेतृत्वाची चर्चा नेहमीच होत असते. कारण धोनीच्या संघात आल्यावर एखाद्या खेळाडूची कामगिरी उजवी होते, असे म्हटले जाते. धोनी हा खेळाडूंना विश्वास देतो. रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अंबाती रायुडू… अशी काही उदाहरणं तुम्ही पाहू शकता.

वाचा-

धोनीमध्ये वेगळे आहे तरी काय…धोनीबाबत चेन्नई सुपर किंग्समधील ड्वेन ब्राव्होने सांगितले की, ” धोनी हा सर्वात वेगळा कर्णधार आहे. चेन्नईच्या संघात बरेच कर्णधार होते. फॅफ ड्यु प्लेसिस, ब्रेंडन मॅक्युलम, माइक हसी आणि मी, असे चार कर्णधार चेन्नईच्या संघातून खेळत होतो. पण धोनीचे नेतृत्व सर्वात वेगळे आहे. कारण जेव्हा एखादा खेळाडू संघात येतो तेव्हा धोनी त्याला म्हणतो की, तु या संघात स्थान मिळवण्यासाठी लायक आहेस. तुला काहीही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही. तू फक्त तुझा खेळ करत राहा.”

वाचा-

ब्राव्हो पुढे म्हणाला की, ” जो खेळाडू चेन्नईच्या संघात येतो तेव्हा त्याची कामगिरी दमदार होते. अंबाती रायुडू हा मुंबई इंडियन्सच्या संघात होता, पण त्याची कामगिरी चांगली होत नव्हती. तो जेव्हा चेन्नईच्या संघात आला तेव्हा त्याची कामगिरी सुधारली. त्याचबरोबर शेन वॉटसनचेही उदाहरण आपण घेऊ शकतो. धोनीने संघात आलेल्या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष दिले आहे, त्याचबरोबर त्यांची कामगिरी उजवी कशी होईल, यासाठी धोनी प्रयत्नशील असतो.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here