वेस्ट इंडिजमधील सेंट विंन्सेंट अॅण्ड ग्रेनेडा येथे आजपासून टी-१० लीग स्पर्धेला सुरूवात होत आहे. या स्पर्धेत वेस्ट इंडिजचे सर्व खेळाडू सहभागी होणार आहेत. करोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा बंद असताना आता चाहत्यांचे मनोरंजन करणारी ही स्पर्धा सुरू होत असल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
वाचा-
विंसी प्रीमिअर लीग स्पर्धा २२ मे ते ३१ मे या काळात होणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा वेस्ट इंडिजमधील सेंट विंन्सेंट अॅण्ड ग्रेनेडा येथे होणार आहे. आल्यानंतर पूर्ण सदस्य असलेल्या एका देशात प्रथमच स्पर्धा सुरू होत आहे. तसेच ही अशी स्पर्धा आहे जेथे करोना आल्यापासून आंतरराष्ट्रीय स्थरावरील खेळाडू भाग घेतील.
वाचा-
स्पर्धेत ६ संघ असून त्यात ७२ खेळाडू आहेत. या सर्वांची निवड ११ मे रोजी करण्यात आली. १० दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ३० सामने खेळले जातील. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना रोज ३ सामने पाहता येतील.
थुंकी लावता येणार नाही
विंसी प्रीमिअर लीग स्पर्धेत गोलंदाजांना चेंडूला थुंकी लावता येणार नाही. गोलंदाजांना चेंडूला थुंकी न लावता खेळावी लागणारी ही पहिली स्पर्धा आहे. सेंट विंन्सेंट अॅण्ड ग्रेनेडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किशोर शैलो यांनी याबाबत माहिती दिली. खेळाडूंसाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. पॅव्हेलियन अशा पद्धतीने तयार केले आहे जी ज्यामुळे गर्दी होणार नाही.
सेंट विंन्सेंट अॅण्ड ग्रेनेडा येथे करोनाचे १८ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १० जण पूर्णपणे बरे झाले आहेत. विशेष म्हणजे ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक मैदानात येऊ शकतील त्यावर कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यात आलेली नाही.
सामन्याची वेळ आणि कुठे पाहाल
भारतीय प्रमाणवेळेनुसार या स्पर्धेतील सर्व सामने रात्री ६, ८ आणि १० वाजता सुरू होणार आहेत. हे सर्व सामने तुम्ही स्टार स्पोटर्स आणि सोनी ईएसपीएन वर पाहू शकता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times