वाचा-
जर सभ्य क्रिकेटपटूंचा संघ तयार केला तर त्याचा कर्णधार न्यूझीलंडचा कर्णधार हा असेल. क्रिकेटमधील सभ्यपणा जपणाऱ्या खेळाडूंमध्ये केनचा समावेश होतो. या वर्षी जानेवारी महिन्यात जेव्हा भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा म्हणाला, न्यूझीलंड संघाची वागणूक इतकी चांगली होती की त्यांना द्वेष करता येणार नाही.
वाचा-
भारतीय संघाचा २०१९च्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. या संदर्भात विराटला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्याने वरील उत्तर दिले होते. न्यूझीलंड दौऱ्यात वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेण्याची भावना आहे का असे विराटला विचारण्यात आले होते. त्यावर विराट म्हणाला, किवी संघाचा द्वेष करणे अत्यंत अवघड आहे.
वाचा-
विराट आणि केनची मैत्री क्रिकेट जगतात लोकप्रिय आहे. न्यूझीलंड दौऱ्यात सोशल मीडियावर अशी चर्चा होती की, केन सोबतच्या मैत्रीमुळेच विराट आक्रमकता कमी करत आहे. या दोघांचा सीमारेषेबाहेर बसलेला फोटो व्हायरल झाला होता.
वाचा-
शुक्रवारी विराट कोहलीने सोशल मीडियावर केनसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ‘आपल्यातील चर्चा खुप छान व्हायच्या. एक चांगला व्यक्ती’, असे हा फोटो शेअर करताना विराटने म्हटले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times