मुंबई: भारतात एप्रिल आणि मे हे दोन महिने क्रिकेटमधील सर्वात मनोरंजन करणारे असे ठरले असते. गेली १२ वर्ष या काळात आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेट चाहते याचा आनंद घेत आहे. अधिकतर वेळा स्पर्धा एप्रिल आणि मे महिन्यात झाली आहे. यंदा देखील आयपीएलच्या १३व्या हंगामातील फायनल २४ मे रोजी होणार होती. पण करोना व्हायरसमुळे सर्व काही बिघडवले आणि क्रिकेटसह सर्व क्रीडा स्पर्धेला ब्रेक लागला.

वाचा-
यावर्षी २९ मार्चपासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार होती आणि फायनल २४ मे रोजी झाली असती. पण आता ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित झाली आहे. पण क्रिकेट चाहत्यांनी निराश होण्याची कारण नाही. तुम्ही २४ मे पासून आयपीएलच्या फायनल सामन्यांचा आनंद घेऊ शकता. २४ तारखेपासून स्टार स्पोटर्सवर आयपीएलच्या दोन फायनल मॅच दाखवल्या जाणार आहेत.

वाचा-
करोना व्हायरसमुळे Live क्रिकेटची शक्यता कमीच आहे. त्यामुळे स्टारने आयपीएलच्या गेल्या १२ हंगामातील फायनल दाखवण्याचे ठरवले आहे. २४ ते २९ मे या काळात तुम्ही हे सामने पाहू शकता. पहिल्या दिवशी २०१९ आणि २०१८ मधील फायनल पाहण्याची संधी आहे.

वाचा-
स्टार स्पोट्रर्सवर पहिल्या दिवशी सकाळी ११ वाजता २०१९ची फायनल तर दुपाही ३ वाजता दुसरी फायनल पाहता येईल.

वाचा-

कधी कोणता सामना पाहाल
२४ मे-
सकाळी ११ वाजता- २०१९ची फायनल
दुपारी ३ वाजता- २०१८ची फायनल

२५ मे-

सकाळी ११ वाजता- २०१७ची फायनल
दुपारी ३ वाजता- २०१६ची फायनल

२६ मे-

सकाळी ११ वाजता- २०१५ची फायनल
दुपारी ३ वाजता- २०१४ची फायनल

२७ मे-

सकाळी ११ वाजता- २०१३ची फायनल
दुपारी ३ वाजता- २०१२ची फायनल

२८ मे-

सकाळी ११ वाजता- २०११ची फायनल
दुपारी ३ वाजता- २०१०ची फायनल

२९ मे-

सकाळी ११ वाजता- २००९ची फायनल
दुपारी ३ वाजता- २००८ची फायनल

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here