वाचा-
कसोटी क्रिकेटमध्ये ६५ वर्षांपूर्वी म्हणजे १९५५ साली झालेल्या सामन्यात हा विक्रम झाला होता. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ अवघ्या २६ धावांवर बाद झाला. हा नकोसा वाटणारा विक्रम आज देखील न्यूझीलंडच्या नावावर आहे.
वाचा-
न्यूझीलंडच्या क्रिकेट चाहत्यांना आजही याबद्दल वाईट वाटते. ‘द बेज ब्रिगेड’ या न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या समर्थकांच्या गटाचे सहसंस्थापक पॉल फोर्ड यांनी एएफपीशी बोलताना सांगितले की, न्यूझीलंडचा समर्थक म्हणून आम्हाला नक्कीच आनंद होईल की एखादा संघ हा विक्रम आमच्या नावावरून मागे टाकेल. हे एक प्रकारे लाजिरवाणे आहे. एखादा संघ कसोटीत २५ धावांवर बाद झाला तर आम्हाला आनंद होईल.
वाचा-
अर्थात या कसोटी सामना आताच्या कसोटी सामन्याच्या तुलनेत वेगळा होता. त्याचे स्वरुप थोडे वेगळे होते. न्यूझीलंडने हा विक्रम केला तेव्हा भारताने पहिला कसोटी विजय मिळून ३ वर्ष झाली होती आणि पाकिस्तान संघाने दोन वर्षापूर्वी वनडेत पदार्पण केले होते.
तेव्हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन संघ मजबूत होते. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला. डुनेडिन येथे झालेला पहिला कसोटी सामना इंग्लंडने ८ विकेटनी जिंकला. त्यानंतर ऑकलंड येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने २०० धावा केल्या. इंग्लंडने पहिल्या डावात २४६ धावांची आघाडी घेतली.
वाचा-
दुसऱ्या डावात न्यूझीलंडचे पाच खेळाडू शून्यावर बाद झाले. त्यांचा एकच फलंदाज बर्ट सुटक्लिफे याने दुहेरी धावसंख्या केली आणि संपूर्ण संघ २६ धावांवर बाद झाला. या खराब कामगिरीनंतर चाहते प्रचंड रागात होते. पण कर्णधार ज्योफ राबोने संघाचा बचाव केला.
या कसोटी सामन्याआधी न्यूझीलंडने एक वर्षाहून अधिक काळ कसोटी क्रिकेट हा प्रकार खेळला नव्हता. निवड समितीमधील दोषामुळे संघ इतका मजूबत नव्हता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times