वाचा-
इंग्लंडमधील क्रिकेटपटूंनी वैयक्तीक सराव सुरू केला आहे. इंग्लंडचा जलद गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने लॉकडाऊननंतर प्रथमच सरावाला सुरूवात केली असून त्याचा एक व्हिडिओ त्याने इस्टाग्रामवर शेअर केला आहे. नॉटिंघमशायर येथे ट्रेंट ब्रिज मैदानावर ब्रॉड गोलंदाजीचा सराव करत असून त्याची माहिती पोस्ट केली आहे.
वाचा-
सरावा दरम्यान ब्रॉडच्या चेंडूने थेट विकेटचा वेध घेतला. सरावा दरम्यान कोरना लागण होऊ नये म्हणून आपण कशी काळजी घेतील हे देखील ब्रॉडने व्हिडिओ शेअर करताना सांगितले आहे. मैदातान त्याच्या सोबत फक्त एक फिजिओ होता. जो कॅमेरामॅनची जबाबदारी पार पाडली.
वाचा-
करोनामुळे इंग्लंडमध्ये एक जुलैपर्यंत सर्व सामने रद्द करण्यात आले आहेत. अन्य देशात देखील क्रिकेटचे पहिले सत्र संपले आहे. अर्थात कोरनाच्या संकटात देखील इंग्लंड आणि वेल्स बोर्ड वेस्ट इंडिज विरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा विचार करत आहे. ही मालिका नियोजित वेळेनुसार जूनमध्ये होणार होती.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times