आयपीएल खेळवण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसलेली आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द झाला तर त्या कालावधीमध्ये आयपीएल खेळवण्यासाठी बीसीसीआय सज्ज आहे. पण जर विश्वचषक रद्द होऊन जर आयपीएल खेळवण्यात आली, तर त्याचा निषेध करायला हवा, अशी प्रतिक्रीया एका माजी कर्णधाराने दिली आहे.

विश्वचषक स्पर्धा रद्द होऊ शकते, असे म्हटले जात आहे. याबाबतचा निर्णय पुढच्या आठवड्यात होणार आहे. विश्वचषक जर रद्द झाला तर ते बीसीसीआयच्या पथ्यावर पडू शकते. कारण बीसीसीआयला या कालामधीमध्ये आयपीएल खेळवता येऊ शकते. पण जर विश्वचषक होऊ शकत नसेल, तर आयपीएलही खेळवता कामा नये, असे एका माजी कर्णधाराने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलेन बोर्डर यांनी सांगितले की, ” विश्वचषक रद्द करून आयपीएल खेळवण्याचा घाट घातला जाऊ शकतो. पण जर विश्वचषक रद्द होत असेल तर आयपीएलही खेळवता कामा नये. कारण ज्या कारणामुळे विश्वचषक रद्द होऊ शकतो, तेच कारण आयपीएललाही लागू पडू शकते. त्यामुळे या गोष्टीचा विचार सर्व देशांनी करायला हवा.”

बोर्डर पुढे म्हणाले की, ” विश्वचषक ही एक जागतिक स्पर्धा आहे. या स्पर्धेत जगभरातील अव्वल संघ सहभागी होत असतात. दुसरीकडे आयपीएल ही पैसा कमावण्यासाठी खेळवली जाते. त्यामुळे आयपीएलपेक्षा विश्वचषकाचा दर्जा नक्कीच वरचा आहे. त्यामुळे सर्व देशांनी आयपीएलपेक्षा विश्वचषकाला महत्व द्यायला हवे. पण जर विश्वचषक रद्द करून आयपीएल खेळवण्यात येत असेल, तर त्याला निषेध करायलाच हवा.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here