आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही क्रिकेटपटूंनी आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. चौकार आणि षटकारांनी त्यांनी आपल्या चाहत्यांना आनंदीत केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही फलंदाजांनी आपल्या षटकार आणि चौकारांच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकलेली आहेत. आपल्या धडाकेबाज फलंदाजीने त्यांनी चाहत्यांना आनंद दिलेला आहे. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता असेल की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार कोणाच्या नावावर आहेत. त्याचबरोबर सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदजांमध्ये नेमके कोण कोण आहेत. क्रिकेट जगतामध्ये सर्वाधिक षटकार कोणाच्या नावावर आहेत, ही गोष्ट तुम्हला माहिती आहे का… सर्वाधित षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताच्या दोन खेळाडूंचाही समावेश आहे. या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत क्रिकेट जगतामध्ये देशाचे नाव उंचावलेले आहे.हे दोन भारतीय फलंदाज आहेत तरी कोण, पाहा…

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे. धोनीने आपल्या १५ वर्षांच्या करीअरमध्ये ३५९ षटकार ठोकलेले आहेत. धोनी आतापर्यंत ५३८ सामने खेळलेला आहे. त्याच्या नावावर १७२६६ धावा जमा आहेत, त्याचबरोबर धोनीच्या नावावर १८४५ चौकारही आहेत. धोनी या यादीत चौथ्या स्थानावर जाणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. कारण गेल्या वर्षभरापासून धोनी हा भारतीय संघाकडून खेळलेला नाही. धोनीचे पुररागमनही आता कठिण दिसत आहे. त्यामुळे धोनी पुन्हा भारतासाठी खेळणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम हा सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर आहे. ब्रेंडन मॅक्युलम आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला आहे, त्यामुळे तो या यादीत पुढे जाऊ शकत नाही. ब्रेंडन मॅक्युलमने आतापर्यंत ४२३ सामन्यांमध्ये ३९८ षटकार लगावलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या करीअरमध्ये त्याने १४,६७६ धावाही फटकावलेल्या आहेत. ब्रेंडन मॅक्युलम या यादीमध्ये चौथ्या स्थानावर असला तरी तो पाचव्या स्थानावर जाऊ शकतो. कारण भारताचा एक फलंदाज चौथे स्थान पटकावू शकतो, असे म्हटले जात आहे.

भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. रोहितने आतापर्यंत ४२३ षटकार लगावलेले आहेत, त्यामुळे तो आफ्रिदी आणि गेलचा विश्वविक्रम मोडी शकतो, असे दिसत आहे. रोहितच्या नावावर वनडेमध्ये तीन द्विशतके आहेत. हा विश्वविक्रम अजूनपर्यंत एकाही फलंदजाला जमलेला नाही. रोहितने आतापर्यंत ३६४ सामन्यांमध्ये १४,०२९ धावा केलेल्या आहेत. आतापर्यंत रोहितने १२७८ चौकारही लगावलेले आहेत. रोहितला आता आफ्रिदी आणि कालांतराने गेलचा विश्वविक्रम मोडण्याची संधी असेल.

सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी. आतापर्यंत आफ्रिदीने २२ वर्षांच्या करीअरमध्ये ११, १९६ धावा केल्या आहेत, यामध्ये १०५३ चौकरांचाही समावेश आहे. आफ्रिदीने आपल्या करीअरमध्ये ४७६ षटकार लगावले होते. आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता आफ्रिदीला गेलचा विक्रम मोडता येणार नाही. पण दुसरीकडे आफ्रिदीचा हा विक्रम भारताचा एक फलंदाज मोडू शकतो, असे दिसत आहे.

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. आतापर्यंत गेलने ४६२ सामने खेळले आहेत, या सामन्यांमध्ये त्याने २५, १२८ धावा केल्या आहेत, यामध्ये २३१२ चौकारांचा समावेश आहे. गेलने आतापर्यंत सर्वाधिक ५३४ षटकार लगावले आहेत आणि या यादीमध्ये तो अव्वल स्थानावर आहे.गेलने अजूनही निवृत्ती पत्करलेली नाही. त्यामुळे हा विश्वविक्रम गेलच्या नावावर काही दिवस अबाधित राहू शकतो, असे म्हटले जात आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत बऱ्याच खेळाडूंनी नावलैकिक कमावला आहे. पण धडाकेबाज फलंदाज करत ख्रिस गेल, शाहिद आफ्रिदी, रोहित शर्मा, ब्रेंडन मॅक्युलम आणि महेंद्रसिंग धोनी यांनी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या अव्वल पाच फलंदाजांच्या यादीत प्रवेश केलेला आहे. शाहिद आणि ब्रेंडन आता निवृत्त झालेले आहेत. त्याचबरोबर गेल आणि धोनी आता जास्त वर्षे क्रिकेट खेळतील, असे वाटत नाही. त्यामुळे आता त्यांची जागा कोणते क्रिकेटपटू घेतात, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here