करोना व्हायरसमुळे खेळाडू आपल्या घरीच बसून आहे. पण घरी बसून ते काही व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. या बाबतीत सर्वात आघाडीवर आहे तो ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर. आतातर वॉर्नरने चक्क अक्षय कुमारचा सुपरहिट गाण्यावर भन्नाच डान्स केल्याचे समोर आले आहे. वॉर्नरनेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

बॉलीवूडमध्ये अक्षय कुमारने आपले एक स्थान निर्माण केले आहे. अक्षयचे बरेच सिनेमे सुपर हिट ठरलेले आहेत, त्याचबरोबर त्याच्या सिनेमातील गाण्यांनाही चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. आता तर ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने आपला एक व्हिडीओ बनवण्यासाठी थेट अक्षयच्या एका नवीन गाण्याची निवड केली आहे.

या व्हिडीओमध्ये वॉर्नर हा सुट घालून आलेला दिसत आहे. वॉर्नरचा टिपटॉप लुक चाहत्यांना चांगलाच पसंत पडलेला आहे. यावेळी वॉर्नरने अक्षय कुमारच्या एका प्रसिद्ध गाण्यावर डान्स केला आहे. हाऊसफुल्ल हा सिनेमा चांगलाच गाजला होता. त्यामुळे त्याचे चार भाग करण्यात आले. हाऊसफुल्लच्या चौथ्या भागात अक्षय कुमारचे ‘बाला ओ बाला’ हे गाणे चांगलेच हिट झाले होते. या गाण्यावर वॉर्नरने जबरदस्त डान्स केल्याचे समोर आले आहे.

अक्षय कुमारने जसा गाण्यावर डान्स केला होता, तसाच डान्स वॉर्नरने या व्हिडीओमध्ये केलेला आहे. या गाण्यावरचा अक्षयचा डान्स चांगलाच हिट झाला होता आता वॉर्नरचा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरतो का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here