करोना व्हायरसचा प्रसार सुरु असताना क्रिकेट लीग खेळवण्याचे धाडस वेस्ट इंडिजने दाखवले होते. आजपासून या लीगला सुरुवात झाली. या लीगची धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली. कारण या लीगच्या पहिल्याच सामन्यात भन्नाट हॅट्रीक पाहायला मिळाली.

वेस्ट इंडिजमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेपटूंचा सहभाग असलेल्या विंन्सी क्रिकेट लीगला आजपासून सुरुवात झाली. या लीगच्या आजच्या पहिल्याच सामन्यात चागंलीच रंगत पाहायला मिळाली. कारण हा सामना चांगलाच अटीतटीचा झाला होता. अखेरच्या षटकपर्यंत हा सामना कोण जिंकले, हे कोणालाही सांगता येत नव्हते.

या लीगमध्ये आजचा पहिला सामना सॉल्ट पाँड ब्रेकर्स आणि ग्रेनेडाइंस डाइव्हर्स या संघात झाला. या सामन्यात ब्रेकर्सने तीन विकेट्स राखून बाजी मारली. पण या सामन्याच्या अखेरच्या षटकात एक भन्नाट हॅट्रिक पाहायला मिळाली. ग्रेनेडाइंसने १० षटकांमध्ये ६८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ब्रेकर्स संघाने तीन विकेट्स राखून विजय मिळवला.

… अशी झाली हॅट्रिकया सामन्यातील दहाव्या षटकात सुनील आंब्रिसने चेंडू वेसरिक ट्रफकडे दिला. या षटकात ट्रफने हॅट्रीक काढल्याचे पाहायला मिळाले. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर पण चौथ्या चेंडूवर रिची रिचर्ड्स हा बाद झाला आणि या षटकात पहिला बळी बाद झाला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर ट्रफने ऐंसन लॅचमॅनला झेलबाद केले. हा ट्रफचा षटकातील तिसरा बळी होती. या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ट्रफने जेरोन वाइलला पायचीत पकडत आपली हॅट्रिट पूर्ण केली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here