सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूच्या मुलीला चाहते ट्रोल करताना दिसत आहेत. पण या क्रिकेटपटूचा गुन्हा नेमका आहे तरी काय, असा सवाल काही व्यक्ती विचारत आहे. पण हे प्रकरण एवढे भडकले असून नेमकं झालंय तरी काय…

सध्याच्या घडीला करोना व्हारसमुळे लॉकडाऊन सुरु आहे. या काळात सर्व आजी-माजी क्रिकेटपटू आपल्या घरातच आहेत. घरात राहून खेळाडू काही मनोरंजक गोष्टी करून आपले व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. त्यामुळे चाहत्यांचेही मनोरंजन होते आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूच्या मुलीने अशीच गोष्ट केली तर तिच्यावर आता काही चाहते टीका करत असल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानचा माजी फिरकीपटू मुश्ताक अहमदच्या मुलीची ही गोष्ट आहे. लॉकडाऊनच्या काळात मुश्ताक हा झोपलेला आहे. तो झोपलेला असताना त्याच्या मुलीने त्याच्या ओठांना लाल रंगाची लिपस्टीक लावल्याचे पाहायला मिळत आहे. या गोष्टीवरून चाहते चांगलेच भडकले असून ते मुश्ताकच्या मुलीला ट्रोल करत आहेत.

मुश्ताकची मुलगी सुमिया ही वडिल झोपलेले असताना त्यांना लिपस्टीक लावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकांनी सुमिया आणि मुश्ताक या दोघांनाही ट्रोल केले आहे. मुश्ताक हा लोकांना धर्माच्या गोष्टी सांगत असतो, पण त्याला आपल्या मुलीलाच सांभाळता येत नाही, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. एका चाहत्याने तर सुमियाच्या कपड्यांवरून कमेंट केली आहे. दुनियाला दाखवायला वेगळे आणि घरी वेगळे कपडे हे लोक घालतात. लोकांना वेगळी शिकवण देतात आणि यांच्या घरात काय चालू आहे, ते पाहा…, अशी कमेंटही एका चाहत्याने केलेली आहे.

मुश्ताकची मुलगी सुमियाने काही तरी गुन्हा केला आहे, अशीच टीका तिच्यावर चाहते करत आहेत. आता जग बदललेले आहे. पूर्वीसारखं फक्त चुल आणि मुलं या दोन गोष्टींपुरता स्त्रिया मर्यादीत राहिलेल्या नाहीत. सध्याच्या जगात मुलीही मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असून त्यांच्या पेहरावावरून टीका करणे किती योग्य आहे, असा सवाल या टीकाकारांना विचारण्यात येत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here