पाकिस्तानमध्ये शुक्रवारी दुपारी विमान दुर्घटना झाली होती. या विमान दुर्घटनेत ९७ लोकांचा मृत्यू झाला असे म्हटले गेले होते. या दुर्घटनेत पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूचाही मृत्यू झाला, अशी बातमी पसरली होती. पण ही गोष्ट खरी आहे का, जाणून घ्या फॅक्ट चेक…

पाकिस्तानमधील विमान दुर्घटनेत पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूचा मृत्यू झाला, अशी बातमी काल पसरली होती. पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शाहचे या विमान दुर्घटनेत निधन झाले, असे काही चाहत्यांनी म्हटले होते. त्याचबरोबर काही चाहत्यांनी तर त्याला श्रद्धांजलीही वाहिली होती. पण या विमान दुर्घटनेत खरंच या क्रिकेटपटूचा मृत्यू झाला होता का, याबद्दलचे फॅक्ट चेक आपण जाणून घेऊया…

यासिरने सोमवारी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये आपल्याला कन्यारत्न झाले आहे, अशी माहिती यासिरने दिली होती. त्यानंतर शुक्रवारी विमान दुर्घटनेत यासिरचा मृत्यू झाला, अशी बातमी व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. कन्यारत्न झाल्यावर काहीच दिवसात यासिरचा मृत्यू झाला, असे चाहत्यांना वाटले आणि त्यामुळे त्यांनी हळहळ व्यक्त केली होती.

जाणून घ्या फॅक्ट चेक…पाकिस्तानमधील विमान दुर्घटनेत क्रिकेटपटू यासिर शाहचा मृत्यू झाला, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. काही चाहत्यांनी त्याला श्रद्धांजलीही वाहिली. पण आपण सुरक्षित असल्याचे दस्तुरखुद्द यासिरने सांगितले.

यासिरने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये यासिर म्हणाला की, ” मी माझ्या घरीच आहे आणि सुरक्षित आहे. मी कोणताही विमान प्रवास करत नव्हतो. पाकिस्तानमधील विमान दुर्घटनेत निधन झालेल्या व्यक्तींना मी श्रद्धांजली वाहतो.” यासिरने आज दुपारी एक वाजून तीन मिनिटांनी हे ट्विट केले होते. पण त्यानंतर यासिरने हे ट्विट डिलीट करून टाकले. पण यासिरच्या ट्विटचे फोटो काही जणांनी काढले असून तो सुरक्षित असल्याचे त्याच्या चाहत्यांना समजले आहे. पण यासिरने हे ट्विट डिलीट का केले, हा प्रश्न मात्र चाहत्यांना पडलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर यासिर देइल, असे त्याच्या चाहत्यांना वाटत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here