पळता पळता चड्डी घसरली, अन् मग…

ही चकित करणारी घटना कोलंबियात सुरु असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स U20 चॅम्पियनशीप स्पर्धेत घडली. (2022 World Athletics U20) इटलीचा अलबर्टो नोनिनो (Alberto Nonino) ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पळत होता. हा १८ वर्षांचा खेळाडू अक्षरश: जीव तोडून पळत होता. पाहता पाहता तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला. मात्र तेवढ्यात त्याची चड्डी खाली घसरली. आश्चर्याची बाब म्हणजे या पठ्ठानं आतमध्ये अंडरवेअर घातलीच नव्हती. परिणामी तो आपली लाज वाचवण्यासाठी धडपड करू लागला. अन् या नादात त्याचं गोल्ड मेडल गेलं. चड्डी सावरण्याच्या प्रयत्नांमुळे त्याचा वेग कमी झाला. अन् याचाच फायदा मागच्या खेळाडूंनी घेत ते पुढे निघून घेले. काही मिनिटांपुर्वी सुवर्ण पदकाचा प्रमुख दावेदार म्हणून पळणाऱ्या या मुलाने शेवटच्या क्रमांकावर स्पर्धा संपवली.

व्हिडीओ पाहून सर्वच जण झाले थक्क

हा मुलगा अंडरवेअरशिवाय ४०० मीटर धावला. खेळ पत्रकार David Sanchez de Castro यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या प्रकरणी त्यांनी अलबर्टो नोनिनो याची मुलाखत देखील घेतली होती. त्यावेळी त्याने अंडरवेअर न घातल्याचं मान्य केलं. या घटनेवर जगभरातील नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here