सध्याच्या घडीला जर जागतिक कसोटी संघ जाहीर केला तर त्यामधून विराट कोहलीला डच्चू देण्यात आला आहे. एकिकडे विराटला संघाबाहेर काढले असले तरी दुसरीकडे पाकिस्तानचा एका फलंदाजाल कोहलीच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. या संघात भारताच्या चार खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे, पण त्यामध्ये कोहलीचा समावेश मात्र नाही.

सध्याच्या घडीला कोहली हा जागतिक क्रिकेटमधील आघाडीचा एक फलंदाज समजला जातो. त्यामुळे कोहलीला कसोटी संघात स्थान न दिल्यामुळे बऱ्याच जणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण सध्याच्या कसोटी संघ निवडताना काही निकष पाळले गेले आहेत. या निकषांमध्ये कोहली बसत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

कसोटी संघ निवडण्याचे निकष काय…हा कसोटी संघ सध्याच्या कामगिरीच्या आधारावर निवडला गेला आहे. त्यामुळे हा संघ सध्याच्या कामगिरीच्या आधारावर निवडला गेला आहे. एक खेळाडू वर्षभरात आठ कसोटी सामने खेळतो. त्यामुळे गेल्या १५ डावांमध्ये त्याने काय कामगिरी केली, या आधारावर हा संघ निवडण्यात आला आहे. गेल्या १५ डावांचा विचार केला तर कोहलीला आतापर्यंत फक्त पाचवेळा ३० धावांचा पल्ला ओलांडता आला आहे. त्यामुळे सध्याचा विराटचा फॉर्म चांगला नसल्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.

भारताच्या चार खेळाडूंना संघा स्थानया संघात कोहलीला स्थान मिळाले नसले तरी भारताच्या चार क्रिकेटपटूंना मात्र संधी मिळाली आहे. या संघात सलामीवीर मयांक अगरवाल, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांना स्थान देण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या कोणत्या खेळाडूचा समावेशऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने जाहीर केलेल्या कसोटी संघात कोहलीला संधी देण्यात आली नाही तर त्याची जागा पाकिस्तानचा क्रिकेटपटू बाबर आझमने घेतली आहे. आझम हा गेले काही सातमे सातत्याने चांगली फलंदाजी करत आहे. त्याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना ब्रिस्बेन येथे नेत्रदीपक शतक झळकावले होते. त्यामुळे या संघात कोहलीला स्थान न देता आझमला संधी देण्यात आली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here