वाचा-
याआधी दोन वेळा आयपीएलमधील फायनल मॅच २४ मे रोजी खेळवण्यात आली आहे. तर तिसरी फायनल मॅच आज होणार होती. पण करोनामुळे ती होऊ शकली नाही. २४ तारखेला याआधी IPL मधील दोन फायनल झाल्या आहेत. २००९ आणि २०१५ साली झालेल्या सामन्यात रोहित विजयी संघात होता.
वाचा-
२००९ साली २४ मे रोजी झालेल्या फायनल मॅचमध्ये हैदराबदच्या डेक्कन चार्जर्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. तेव्हा हैदराबाद संघाचा सदस्य होता. तर २०१५ मध्ये २४ मे रोजी झालेल्या फायनल मॅचमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते. मुंबई संघाचे हे दुसरे विजेतपद होते.
वाचा-
२०१५ साली आजच्या दिवशी मुंबई इंडियन्स संघाने विजेतेपद मिळवले होते आणि रोहित शर्मा त्याचा कर्णधार होता. यामुळेच रोहितसाठी २४ मे ही तारीख लकी मानली जाते. २००९च्या फायनलमध्ये खालच्या स्तरावर फलंदाजी करत रोहितने २४ धावा केल्या होत्या. तर २०१५च्या फायनलमध्ये वादळी अर्धशतकी खेळी केली होती. या सामन्यात त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला होता.
मुंबई इंडियन्स संघाे आतापर्यंत सर्वाधिक आयपीएलमधील ४ विजेतेपद मिळवली आहेत. मुंबईने २०१३ साली पहिला विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर २०१५, २०१७ आणि २०१९ साली अशी चार विजेतेपदे मिळवली आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times