ICAने देशातील ३६ अशा खेळाडूंची यादी तयार केली. ज्यांना खरच आर्थिक मदतीची गरज अशामध्ये टीम इंडियाचे माजी जलद गोलंदाज देवराज गोविंद राज यांचा समावेश आहे. या खेळाडूंना करणार आहे. करोना संकटामुळे या खेळाडूच्या घरात अन्नधान्याची कमतरता निर्माण झाली आहे.
वाचा-
भारतीय संघाला १९७१ साली इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला होता तेव्हा गोविंदराज संघात होते. या दौऱ्यात भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी धावांचा पाऊस पाडला होता. गोविंदराज यांनी प्रथम श्रेणीच्या ९३ सामन्यात १९० विकेट घेतल्या होत्या. गोविंदराज भारतीय संघाचे सदस्य होते पण त्यांना कसोटी संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर ते काही काळ इंग्लंडमध्ये राहिले आणि मग भारतात परतले.
आर्थिक मदतीची गरज असलेल्या एकूण ५२ महिला आणि पुरुष क्रिकेट खेळाडूंचे अर्ज आले होते. हे सर्व खेळाडू प्रथम श्रेणीतून निवृत्त झालेले आहेत. ICAच्या ५ सदस्यीय संचालक मंडळाने ३६ क्रिकेटपटूंना मदत करण्याचे ठरवले आहे.
वाचा-
ICAने दोन गट केले आहेत. ज्या खेळाडूंना ए गटात ठेवले आहे त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये मिळतील. यात ११ पुरुष आणि ९ महिला खेळाडूंसह २० जण आहेत. तर बी गटतील खेळाडूंना प्रत्येकी ८० हजार रुपये दिले जातील. या शिवाय सी गट तयार केला आहे ज्यातील ८ खेळाडूंना प्रत्येकी ६० हजार रुपये दिले जातील.
ICA अशा खेळाडूंना मदत करत आहे जे आजारी आहेत किंवा ज्यांना अन्नधान्य विकत घेण्यासाठी पैशांची गरज आहे, असे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी सांगितले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times