मुंबई: भारताचा दिग्गज फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची विकेट घेण्याचे स्वप्न प्रत्येक गोलंदाजाचे असायचे. पण सर्वांची ही इच्छा पूर्ण व्हायची असे नाही. त्यात ही सचिनला शून्यावर बाद करायचे म्हणजे आणखी मोठे चॅलेंज. सचिनला रणजी ट्रॉफी स्पर्धेत पहिल्यांदा शून्यावर बाद करणाऱ्या भारतीय गोलंदाजाने त्या सामन्याबद्दल एका लाईव्ह चॅटमध्ये सांगितले.

वाचा-
भारताकडून तब्बल २४ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या सचिनला रणजी ट्रॉफी स्पर्धेत पहिल्यांदा भुवनेश्वर कुमारने शून्यावर बाद केले. भुवनेश्वरने २००८-०९च्या सीझनमध्ये उत्तर प्रदेश संघाकडून खेळताना सचिनची विकेट घेतली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याची ही पहिली वेळ होती. भुवनेश्वर तेव्हा फक्त १९ वर्षांचा होता.

वाचा-
अर्थात सचिनला पहिल्यांदा शून्यावर बाद करण्याचे श्रेय भुवनेश्वरने भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ याला दिले.

जेमिमा रोड्रिग्ज आणि स्मृती मानधना यांच्यासोबत डबल ट्रबल या चॅट शोमध्ये बोलताना भुवनेश्वरने सचिनला शून्यावर बाद केलेल्या मॅचबद्दल सांगितले. जेव्हा तुम्ही एखाद्या सामन्यात पहिलीच विकेट शून्यावर घेता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो.

वाचा-

जेव्हा सचिनची विकेट घेता तेव्हा तुम्ही फार लकी असता. मी जेव्हा सचिनची विकेट घेतली तेव्हा आमच्या संघाचा कर्णधार मोहम्मद कैफ होता. कैफने फिल्डरला मिड विकेटला ठेवले होते. त्याने अशा ठिकाणी फिल्डर उभा केला होता जेथे सचिन शॉट मारण्याची शक्यता होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here