तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देणारे हॉकीचे जादूगार बलबीर सिंग सिनिअर यांचे आज निधन झाले. हॉकीचा हा जादूगार हरपल्यावर भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना दु:ख झाले असून त्यांनी एक संदेशही लिहिला आहे. भारतीय हॉकी संघातील महान खेळाडू बलबीर सिंग सिनिअर यांचे निधन झाले. ते ९५ वर्षाचे होते. सिंग यांचे २५ मे रोजी सकाळी चंदिगड येथे निधन झाले. त्यांनी देशाला तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिले होते.

काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी बलबिर यांची भेट घेतली होती. त्यावेळी या दोघांमध्ये चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. यावेळी जुन्या आठवणींना पुन्हा एकदा दोघांनीही उजाळा दिला होता. बलबिर यांच्या निधनानंतर अमित शहा यांना आपली त्यांच्याबरोबरची भेट आठवली आणि त्यांनी या हॉकीच्या जादूगराला निरोप देत एक संदेश लिहिला आहे. अमित शहा यांनी बलबिर यांच्याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अमित शहा यांनी लिहिले आहे की, ” पद्मश्री पुरस्कार विजेते आणि महान हॉकीपटू बलबिर यांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर मला दु:ख झाले. आपल्या हॉकी स्टीकने जादू करत त्यांनी आपली अमीट छाप सोडली होती. भारतासाठी तीन वेळा ऑलिम्पिकपदक जिंकणाऱ्या या महान खेळाडूला भेटण्याचा मला योग आला होता. ”

देशातील महान खेळाडूमध्ये बलबीर यांचा समावेश होतो. आधुनिक ऑलिम्पिक इतिहासातील १६ महान खेळाडूमध्ये त्यांचा समावेश केला जातो. हेलसिंकी ऑलिम्पिक १९५२च्या अंतिम सामन्यात नेदरलँडविरुद्ध त्यांनी पाच गोल केले होते. अंतिम सामन्यात पाच गोल करण्याचा त्यांचा विक्रम आजही कायम आहे. १९५७ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. बलबीर यांनी लंडन ऑलिम्पिक १९४८, हेलसिंकी ऑलिम्पिक १९५२ आणि मेलबर्न ऑलिम्पिक १९५६ या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दिले होते. १९७५ साली हॉकी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचे ते व्यवस्थापक होते. गेल्या दोन वर्षात त्यांना चार वेळा आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. गेल्यावर्षी निमोनिया झाल्याने ते ३ महिने रुग्णालयात होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here