करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरु नाहीत. स्पर्धा सुरु नसल्यामुळे खेळाडू,, पंच, प्रशिक्षक, अधिकारी आणि क्लब्जचे उत्पन्न थांबलेले आहे. त्यामुळे आता घरी बसलेल्या खेळाडूंना आणि खेळाशी निगडीत असलेल्या व्यक्तींना आता मदत करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तीन जूनला या सर्वांसाठी तब्बल ३०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात येणार आहे.

करोना व्हायरसमुळे सध्या सर्वच त्रस्त आहेत. बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊनही सुरु आहे. त्यामुळे कोणत्याही क्रीडा स्पर्धा सध्याच्या घडीला सुरु नाहीत. त्यामुळे खेळाडू घरातच बसून आहेत. त्यांच्याकडे सध्या उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे त्यांना ३०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात येणार आहे.

या ३०० कोटी रुपयांमधून सर्वाधिक रक्कम ही क्बल्जला जाणार आहे. कारण क्लब्जमध्ये खेळ जर सुरु करायचे असतील तर त्यांना काही खबरदारीचे उपाय घ्यावे लागतील. त्यामुळे देशातील १४२ क्लब्जला सर्वात जास्त रक्कम मदतीच्या स्वरुपात देण्यात येणार आहे. त्याचबरोबर खेळाडू आणि खेळाशी निगडीत असलेल्या व्यक्तींनाही ही मदत केली जाणार आहे.

फ्रेंट टेनिस महासंघाने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. या महासंघाने आता तब्बल ३५० लक्ष युरो एवढी रक्कम खेळासाठी मदतीच्या स्वरुपात देण्याचे ठरवले आहे. यापैकी २१० लक्ष युरो एवढी रक्कम क्लब्जला देण्यात येणार आहे. त्याचबरोबर खेळाडू आणि सरकारकडून खेळाशी निगडीत असलेल्या ज्या व्यक्तींना मदत मिळालेली नाही. त्यांना महासंघ आर्थिक मदत करणार आहे.

याबाबत महासंघाचे अध्यक्ष बर्नाड गिऊडीसिली यांनी सांगितले की, ” सध्याच्या घडीला खेळाशी निगडीत असलेल्या व्यक्तींकडे उत्पन्नाचे काहीच साधन नाही. त्यामुळे त्यांना मदत करणे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे या व्यक्तींना आणि विविध क्लब्जना आम्ही मदत करण्याचे ठरवले आहे. ३ जूनला आम्ही ही मत करणार आहोत. या मदतीमुळे खेळाडू आणि खेळाशी निगडीत असलेल्या व्यक्तींना दिलासा मिळेल. क्रीडा स्पर्धा कधी सुरु होतील, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ही मदत मोलाची असेल.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here