लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच वाईट बातम्या कानावर येत आहेत. पण आता एक गूड न्यूज ऐकायला मिळाली आहे. भारताच्या एका क्रिकेटपटूला पूत्ररत्न झालं आहे. आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या संघाचे त्याने प्रतिनिधीत्व केले आहे.

भारताचा गोलंदाज रिषी धवनने ही गूड न्यूज दिली आहे. रिषीच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यामुळे रिषीच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. प्रसूतीनंतर त्याची पत्नी आणि मुलगा दोघेही सुखरुप आहेत. रिषीने आपल्या पत्नीसहीत मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही गोड बातमी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी रिषीला लॉकडाऊन सुरु असताना पोलिसांनी पकडले होते. याबाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले होते. दुपारी एका खासगी गाडीतून रिषी प्रवास करत होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी पकडले होते. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत रिषी गाडीतून फिरत होता. पण घराबाहेर पडण्यासाठी जो पास लागतो, तो रिषीकडे नव्हता. त्यामुळे रिषीला पोलिसांनी पकडले होते. यावेळी रिषीकडून पोलिसांनी ५०० रुपयांचा दंडही वसूल केला होता.

रिषीने भारताचेही प्रतिनिधीत्व केले आहे. आतापर्यंत भारताकडून त्याने तीन वनडे आणि एक ट्वेन्टी-२० सामना खेळला आहे. २०१७नंतर रिषीला भारताकडून एकही सामना खेळता आलेला नाही. पण प्रथम श्रेणी सामन्यात मात्र त्याने दमदार कामगिरी केली आहे. रिषीने ७९ प्रथम श्रेणी सामन्यात ३०८ बळी घेतले आहेत, त्याचबरोबर ३,७००पेक्षाही जास्त धावा त्याच्या नावावर आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here