वुहानमधून करोना व्हायरस जगभरात पसरला. त्यामुळे वुहानमध्ये ४-५ महिने लॉकडाऊन होते. त्यामुळे गेले पाच महिने वुहानमधील लोकं आपल्या घरातच अडकून पडलेली होती. पण एक कोटी १० लाख एवढी लोकसंख्या असलेल्या वुहानमध्ये आता चक्क क्रीडा स्पर्धा भरवल्या जात आहेत. त्यामुळे काही लोकांना आश्चर्याचा धक्काही बसला आहे.
वाचा-
वुहानमधील वॉंग जिजून या फुटबॉलपटूने सांगितले की, ” एप्रिलपर्यंत आम्ही लॉकडाऊनमध्ये होतो. या काळात आम्ही घराबाहेर पडलोच नव्हतो. पण घरात राहून मी फुटबॉलचा सराव करत होतो. फिट राहण्यासाठी माझा व्यायामही सुरु होता. आता वुहानमध्ये फुटबॉलला सुरुवात होत आहे. माझ्यासाठी ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे. बऱ्याच दिवसांनंतर आम्ही मैदानात उतरणार आहोत. त्याचबरोबर सर्व मित्र आता आम्हाला भेटणार आहेत. त्यामुळे आमच्यासाठी ही गोष्ट आनंददायी आहे.”
आता तर चीनमधल्या लोकांना ऑलिम्पिकची स्वप्न पडायली लागली आहेत. कारण ऑलिम्पिकच्या तयारीलाही चीनमधीन खेळाडूंनी सराव सुरु केला आहे. चीनची प्रसिद्ध महिला फुटबॉलपटू वांग शुआंगने वुहान येथे सरावाला सुरुवात केली आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आम्ही सज्ज होत आहोत, असे या खेळाडूने सांगितले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times