सध्याच्या घडीला देशात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनच्या काळात भारताची महिला खेळाडू थेट रस्त्यावर उतरली आहे. ती पोलिस दलात असल्यामुळे लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर उतरून ती देशसेवा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकांच्या सेवेसाठी ती अहोरात्र झटत असल्याचे पाहायला मिळत आहे. कामावर जाण्याची वेळ ठरलेली असली तरी घरी येण्याची वेळ ठरलेली नाही. त्यामुळे काही वेळा १२, तर काही वेळा १६ तासही काम करावे लागत आहे.
एकेकाळी मैदानात आपल्या गुणवत्तेच्या जोरावर जी खेळाडू गोल करायची, तिच आता रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळत आहे. बाहेर पडलेल्या लोकांना समजावणं, त्यांना मदत करणं, एखादी गोष्ट किंवा माहिती मिळत नसेल तर त्यांना ती देणं, यासर्व गोष्टी ही महिला खेळाडू करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ही खेळाडू आहे तरी कोण…अहोरात्र देशसेवा करणारी ही महिला खेळाडू आहे तरी कोण, हा सवाल आता तुम्हाला पडलेला असेल. भारताची महिला फुटबॉलपटू इंदूमती काथिरसन, असे तिचे नाव आहे. ती भारताची खेळाडू असून तामिळनाडू पोलिस दलात ती कामाला आहे. चेन्नईच्या रस्त्यांवर इंदुमती आपले कर्तव्य बजावताना तुम्हाला दिसू शकते.
याबाबत इंदुमती म्हणाली की, ” सध्याच्या घडीला देशभरात वाईट परिस्थिती आहे. पण आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. आपण सर्वांनी एकत्रितपणे लढा दिला तर या परिस्थितीतून आपण बाहेर पडू शकतो. त्यामुळे सध्याच्या घडीला अत्यावश्यक सेवा देण्यासाठी मी तत्पर आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times