एका मुलाखतीमध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी अख्तरला एक प्रश्न विचारला. मांजरेकर यांनी विचारले की, ” सध्याच्या घडीला वेगवान गोलंदाज चेंडू हळू टाकतात, तर फिरकी गोलंदाज वेगाने चेंडू टाकताना दिसतात, याचे नेमके कारण काय अशू शकते?”
या प्रश्नाला उत्तर देताना अख्तर म्हणाला की, ” मी सर्वांसमोर जाहीरपणे सांगतो की, गेल्या दहा वर्षांमध्ये क्रिकेटचा स्तर घसरलेला आहे. आयसीसीने चांगलं क्रिकेट संपवलं आहे. कारण काही नियम हे क्रिकेटला मारक असेच आहेत. सध्याच्या क्रिकेटमध्ये बाऊन्सरची संख्या वाढवाला हवी होती. कारण सध्याच्या क्रिकेटमध्ये सीमारेषेजवळ जास्त खेळाडू नसतात. त्यामुळे गोलंदाजांना काही वेळा समस्या जाणवू शकते. गेल्या दहा वर्षांमध्ये क्रिकेट स्तर खालावलेला आहे का, यावर आयसीसीनेच गंभीरपणे विचार करायला हवा.”
दिले सचिनचे उदाहरण…सचिन हा एक महान क्रिकेटपटू होता. त्यावेळी प्रतिस्पर्धी संघातही दर्जेदार गोलंदाज होते. त्यावेळी सचिन आणि अमुक गोलंदाज, यांचे युद्ध मैदानात रंगायचे. या गोष्टी पाहायला मजा यायची. चाहत्यांनाही या गोष्टी आवडायच्या आणि क्रिकेटचा स्तरही चांगला होता. पण सध्याच्या घडीला मात्र तसे दिलत नाही. सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये अशा गोष्टी पाहायला मिळत नाहीत, असे शोएबने सांगितले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times