लाहोर: तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते महान हॉकीपटू हे फक्त भारताचे रोलमॉडल नव्हते तर ज्या पाकिस्तानचा त्यांनी पराभव केला तेथे देखील बलबीर लोकप्रिय होते. भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक यांचे सोमवारी मोहालीत निधन झाले. बलबीर यांच्या निधनावर पाकिस्तानच्या दिग्गज हॉकी खेळाडूंनी शोक व्यक्त केला. बलबीर फक्त महान खेळाडू नव्हते तर ते सर्वोत्तम व्यक्ती होते, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानमधून येत आहे.

वाचा-
१९८४च्या लॉस एजलिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे पाकिस्तानचे माजी कर्णधार हसन सरदार म्हणाले की, बलबीर सिंग फक्त भारताचे नाही तर संपूर्ण उपखंडाचे महान खेळाडू होते. तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून त्यांनी महान खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले. १९८२ साली आशियाई स्पर्धेत बलबीर यांची भेट झाली होती. ते एक सर्वोत्तम व्यक्ती होते. ते मला पंजाबीत म्हणाले की, आमच्याविरुद्ध कमी गोल करा. त्यांनी माझ्या कामगिरीचे कौतुक केले होते. हसन यांच्या शानदार कामगिरीमुळे पाकिस्तानने १९८२ साली आशियाई स्पर्धेत सुवर्ण आणि त्याच वर्षी मुंबईत वर्ल्ड कप जिंकला होता.

वाचा-
पाकिस्तानला १९६० साली रोम ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देणारे मोतीउल्लाहचे पुतणे समीउल्लाह यांनी देखील बलबीर यांच्या आठवणींना उजाळा दिला. बलबीर सिनिअर हे माझे काका मोतीउल्लाह यांच्या काळात खेळत. त्यांचा वेग आणि चेंडूवरील नियंत्रण शानदार असे होते. ऑलिम्पिकपटू अन्वर अहमद यांनी देखील बलबीर यांच्यासारखा वेग अन्य कोणाकडे नव्हता, असे सांगितले. १९७५ साली भारत दौऱ्यात मी बलबीर आणि ध्यानचंद यांना भेटलो होतो, असे अन्वर म्हणाले.

१९८७ साली इंदिरा गांधी कप दरम्यान मी बलबीर सिंग यांना भेटलो होते. या स्पर्धेत त्यांच्या हस्ते मला मालीकावीर पुरस्काराची ट्रॉफी दिली. ते अतिशय विनम्र होते. २०१८च्या वर्ल्ड कपमध्ये माझी आणि त्यांची पुन्हा भेट झाली. त्यांच्यात कोणताही बदल झाला नव्हता, असे पाकिस्तानचे ऑलिम्पिकपटू शाहबाज अहमद यांनी सांगितले.

वाचा-
मी प्रार्थना करतो की देव त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो. हॉकीने एक महान खेळाडू गमवला आहे, असे पाकिस्तानचे सर्वात महान लेफ्ट हाफ खेळाडू आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे वसीम अहमद म्हणाले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here